Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?

₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?

Sajay Kapur: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचं गुरुवारी निधन झालं. इंग्लंडमध्ये पोलो खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:51 IST2025-06-14T13:49:20+5:302025-06-14T13:51:54+5:30

Sajay Kapur: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचं गुरुवारी निधन झालं. इंग्लंडमध्ये पोलो खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

ev giant dream businessman sanjay kapoor death owner of a company worth rs 31000 crore remained unfulfilled what was his profession | ₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?

₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?

Sajay Kapur: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचं गुरुवारी निधन झालं. इंग्लंडमध्ये पोलो खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ५३ वर्षीय संजय कपूर सोना कॉमस्टारचे चेअरमन होते. ही गुरुग्राममधील ऑटो कंपोनेंट्स कंपनी आहे. म्हणजेच ही कंपनी वाहनांचे पार्ट्स बनवते. ही कंपनी जगभरात वाहनांचे पार्ट्स पुरवते.

संजय कपूर यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसीएमए) अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलंय. एसीएमए ही भारतातील ऑटो पार्ट्स उत्पादक कंपन्यांची संघटना आहे. ते कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) मॅन्युफॅक्चरिंग कौन्सिलचे सहअध्यक्ष होते. डेहराडूनच्या दून स्कूलचे ते बोर्ड सदस्यही होते. याच शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलंय.

७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 

संजय कपूर यांनी पहिला विवाह फॅशन डिझायनर नंदिता महतानी यांच्यासोबत केला होता. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न केलं. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी २००३ मध्ये विवाह केला. त्यांना समायरा आणि कियान अशी दोन मुलं आहेत. २०१४ मध्ये करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी परस्पर संमतीनं घटस्फोटासाठी अर्ज केला होता. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. म्हणजेच दोघांच्या लग्नाला अवघी ११ वर्षे झाली होती. घटस्फोटानंतर संजय यांनी प्रिया सचदेव यांच्यासोबत विवाह केला.

कपूर कुटुंबापेक्षाही श्रीमंत

संजय कपूर हे श्रीमंत व्यक्ती होते. फोर्ब्सच्या मते, संजय कपूर यांची एकूण संपत्ती १.२ बिलियन डॉलर्स (सुमारे १०३०० कोटी रुपये) होती. २०२२ आणि २०२४ मध्ये संजय कपूर यांची संपत्ती १.६ बिलियन डॉलर्स (सुमारे १३००० कोटी रुपये) पर्यंत पोहोचली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता शाहरुख खानची एकूण संपत्ती ८८० मिलियन डॉलर्स (सुमारे ७७०० कोटी रुपये) आहे. त्याच वेळी, कपूर कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे २००० कोटी आहे. अशा परिस्थितीत, संजय कपूर यांची एकूण संपत्ती केवळ शाहरुखपेक्षाच नाही तर कपूर कुटुंबापेक्षाही जास्त होती.

कंपनी आणखी मोठं करण्याचं स्वप्न

कंपनीत व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर संजय कपूर यांनी ती जागतिक पातळीवर नेली. चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत त्यांनी कंपनीचा विस्तार केला. या देशांमध्ये कंपनीचे कारखाने आणि रिसर्च सेंटर्स सुरू केली.

वेगानं वाढणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) बाजारपेठेकडे त्यांनी कंपनीचं लक्ष वेधलं. सोना कॉमस्टार ही ईव्हीसाठी पार्ट्स बनवणारी मोठी कंपनी बनवणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. मात्र, त्यांचं हे स्वप्न कदाचित अपूर्णच राहिलं. इलेक्ट्रिक वाहनांवर त्यांचा भर होता. यामुळे कंपनी भविष्यात पुढे जाण्यासाठी सज्ज झाली आहे. ब्लूमबर्गनुसार, सोना कॉमस्टारचं मार्केट कॅप सुमारे ४ मिलियन डॉलर (सुमारे ३१,००० कोटी रुपये) आहे.

Web Title: ev giant dream businessman sanjay kapoor death owner of a company worth rs 31000 crore remained unfulfilled what was his profession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.