Lokmat Money > बिझनेस न्यूज > डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?

डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?

Donald Trump Earning: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ मध्ये ६०० मिलियन डॉलर (सुमारे ५,१७५ कोटी रुपये) कमावले असल्याची माहिती समोर आलीये. पाहा कुठून त्यांनी वर्षभरात केली इतकी कमाई.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:44 IST2025-06-16T11:42:45+5:302025-06-16T11:44:14+5:30

Donald Trump Earning: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ मध्ये ६०० मिलियन डॉलर (सुमारे ५,१७५ कोटी रुपये) कमावले असल्याची माहिती समोर आलीये. पाहा कुठून त्यांनी वर्षभरात केली इतकी कमाई.

Donald Trump earned rs 5100 crore in a year where did he get so much money crypto investment business bible sell | डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?

डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?

Donald Trump Earning: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ मध्ये ६०० मिलियन डॉलर (सुमारे ५,१७५ कोटी रुपये) कमावले असल्याची माहिती समोर आलीये. क्रिप्टोकरन्सी, गोल्फ क्लब, लायसन्सिंग आणि इतर व्यवसायांमधून त्यांनी ही मोठी कमाई केली. विशेष म्हणजे ग्रीनवूड बायबलच्या विक्रीतूनही त्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी आपल्या भारतीय व्यवसायातून ४२.५ कोटी रुपये कमावले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची संपत्ती आता १.६ बिलियन डॉलर्स (अंदाजे १३,३०० कोटी रुपये) इतकी आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या पब्लिक फायनान्शियल डिस्क्लोजर रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी गेल्या वर्षी आपल्या क्रिप्टो गुंतवणुकीतून तसंच रिअल इस्टेट प्रकल्प आणि गोल्फ रिसॉर्टमधून मिळालेल्या उत्पन्नातून मोठी कमाई केली.

२०२४ च्या सुरुवातीला ट्रम्प यांनी '$TRUMP' हे मीम कॉईन बाजारात आणलं होतं. या डिजिटल चलनातून ट्रम्प यांना सुमारे ३२० मिलियन डॉलरची कमाई होण्याचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, ट्रम्प कुटुंबानं वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल नावाच्या डिसेंट्रलाईज्ड फायनान्स कंपनीकडून ४०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोळा केली, ज्याकडे सुमारे १५.७५ अब्ज गव्हर्नन्स टोकन आहेत आणि कंपनीशी संबंधित टोकन विक्रीतून वैयक्तिकरित्या ५७.३५ मिलियन डॉलर्स उभे केले आहेत.

Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट

रॉयटर्सच्या एका अंदाजानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पॅसिव्ह गुंतवणुकीतून किमान १०० कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये व्याज आणि लाभांश उत्पन्नाचा समावेश आहे. त्यांची गुंतवणूक सुमारे १७५० कोटी रुपयांची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रम्प यांनी व्हिएतनाममधील एका प्रकल्पातून ५ मिलियन डॉलर्स, भारतातील एका प्रकल्पातून १० मिलियन डॉलर्स आणि दुबईतील लायसन्सिंग प्रोजेक्टमधून सुमारे १६ मिलियन डॉलर्स कमावलेत.

गोल्फ रिसॉर्टमधूनही कमाई

ट्रम्प यांचे फ्लोरिडामध्ये ज्युपिटर, डोरल आणि वेस्ट पाम बीच हे तीन प्रमुख गोल्फ रिसॉर्ट आहेत. याशिवाय त्यांचा मार-ए-लागो हा खासगी क्लब आहे. 'ब्लू मॉन्स्टर कोर्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकट्या ट्रम्प नॅशनल डोरलमधून ट्रम्प यांनी ११०.४ मिलियन डॉलर्सची कमाई केली. या सर्व मालमत्तांमधून ट्रम्प यांना एकूण २१७.७ मिलियन डॉलरचा महसूल मिळाला.

बायबल विक्रीतून कमाई

ट्रम्प यांना ग्रीनवुड बायबलमधून १.३ मिलियन डॉलर्स, ट्रम्प वॉचेसमधून २.८ दशलक्ष डॉलर्स आणि ट्रम्प स्नीकर्स आणि फ्रॅगरन्समधून २.५ दशलक्ष डॉलर्स रॉयल्टी उत्पन्न मिळवलं. त्याचबरोबर एनएफटी (डिजिटल ट्रेडिंग कार्ड) मधून त्यांनी १.१६ मिलियन डॉलर्स कमावले. त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी त्यांच्या एनएफटी सीरिजमधून २१६,७०० डॉलर्स कमावले आणि ब्लू ओवल कॅपिटल कॉर्प, चार्ल्स श्वाब आणि इन्वेस्को सारख्या फंडांमध्ये १२ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली.

Web Title: Donald Trump earned rs 5100 crore in a year where did he get so much money crypto investment business bible sell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.