Dixon Tech share: भारतीय शेअर बाजाराचे अच्छे दिन पुन्हा एकदा येत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतेय. या सकारात्मक वातावरणात ब्रोकरेज फर्म नोमुरानं डिक्सन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. यासह नवीन टार्गेट प्राइस निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी डिक्सन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. आदल्या दिवसाच्या बंदच्या तुलनेत हा शेअर ६०० रुपयांहून अधिक वधारला.
टार्गेट प्राइस काय आहे?
नोमुरानं डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअरवर 'बाय' रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राइस २१,४०९ रुपयांपर्यंत वाढवली. ब्रोकरेजनुसार, भारतातील मोबाइल इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (ईएमएस) उद्योग डिक्सन, डीबीजी टेक्नॉलॉजी (चीन), भगवती, बीवायडी (हाँगकाँग), यूटीएल निओलिंक आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स सारख्या काही प्रमुख कंपन्यांमध्ये विभागला जाण्याची शक्यता आहे. ब्रोकरेजनुसार, डिक्सनने वेगानं नवीन ग्राहक जोडले आहेत.
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
तिमाही निकाल कसा?
गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत डिक्सन टेक्नॉलॉजीजचा निव्वळ नफा चार पटीनं वाढून ४६४.९५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ९७.३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेशन्समधून मिळणारं उत्पन्न १०,२९२.५४ कोटी रुपये झालाय, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ४,६५७.९७ कोटी रुपये होतं. चौथ्या तिमाहीत एकूण खर्च वाढून ९,९८१.९२ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ४,५४७.९५ कोटी रुपये होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)