Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले

ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले

गुरुवारी टेस्लाच्या मार्केट कॅपमध्ये झालेली घसरण ही भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) संपूर्ण मार्केट कॅपपेक्षा जास्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:33 IST2025-06-06T14:26:06+5:302025-06-06T14:33:39+5:30

गुरुवारी टेस्लाच्या मार्केट कॅपमध्ये झालेली घसरण ही भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) संपूर्ण मार्केट कॅपपेक्षा जास्त आहे.

dispute between trump and musk tesla shares hit hard 152 billion dollar lost more than tcs market cap | ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले

ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले

इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाच्या शेअरमध्ये गुरुवारी घसरण झाली. कंपनीचे शेअर्स गुरुवारी १४ टक्क्यांनी घसरले. टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेली घसरण कंपनीशी संबंधित कोणत्याही विशिष्ट मुद्द्यांमुळे किंवा फंडामेंटलमुळे झाली नसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'वन बिग ब्युटीफुल बिल'वरून टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि ट्रम्प यांच्यात सुरू असलेल्या सार्वजनिक संघर्षामुळे झाली आहे. टेस्लाचा शेअर गुरुवारी २८४.७ डॉलर्सवर बंद झाला. तर टेस्लाचे शेअर्स ४८८.५४ डॉलरच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ४१% घसरलेत.

मार्केट कॅप घसरलं

गुरुवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानं टेस्लाचे मार्केट कॅप १५२ अब्ज डॉलरने कमी झालं. कंपनीचं मार्केट कॅप १ ट्रिलियन डॉलरच्या खाली ९१६ अब्ज डॉलर्सवर पोहोचलं. टेस्लाच्या मार्केट कॅपमध्ये एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानं इलॉन मस्क यांच्या संपत्तीत ३४ अब्ज डॉलरची घट झालीये.

Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा

सर्वात मोठी घसरण

गुरुवारी टेस्लाच्या मार्केट कॅपमध्ये झालेली घसरण ही भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) संपूर्ण मार्केट कॅपपेक्षा जास्त आहे. टीसीएसचं मार्केट कॅप गुरुवारी १४२ अब्ज डॉलर होतं. टेस्लाच्या मार्केट कॅपमध्ये झालेली घसरण एचडीएफसी बँकेच्या एकूण बाजारमूल्याच्या ८८ टक्के आहे. एचडीएफसी बँकेचं मार्केट कॅप गुरुवारच्या सत्राअखेर १७३ अब्ज डॉलर होतं. 

तर टेस्लाच्या मार्केट कॅपमध्ये झालेली घसरण ही भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ६७ टक्के आहे. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप २२७ अब्ज डॉलर्स होतं. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेनंतर भारतातील तिसरी सर्वात मूल्यवान कंपनी आहे.

Web Title: dispute between trump and musk tesla shares hit hard 152 billion dollar lost more than tcs market cap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.