Lokmat Money > बिझनेस न्यूज > आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी

आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी

विमा आणि रिअल इस्टेटमध्ये भरतीत चांगली वाढ; आयटी, टेलिकॉम, रिटेल, बँकिंगमध्ये घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:01 IST2025-06-04T08:00:58+5:302025-06-04T08:01:50+5:30

विमा आणि रिअल इस्टेटमध्ये भरतीत चांगली वाढ; आयटी, टेलिकॉम, रिटेल, बँकिंगमध्ये घट

Demand for experienced employees in senior positions in the fields of Artificial Intelligence, Machine Learning | आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी

आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतातील नोकऱ्यांच्या बाजारात सध्या मोठ्या घडामोडी दिसत आहेत. ‘नोकरी जॉबस्पीक मे २०२५’च्या अहवालानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग या क्षेत्रांमध्ये वरिष्ठ स्तरावर अनुभवी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे. कंपन्यांना कौशल्यांची जाण असलेल्या मनुष्यबळाची गरज भासत आहे.

विविध उद्योगांतील भरतीचा ट्रेंड पाहता एआय, विमा, रिअल इस्टेट आघाडीवर राहिले, तर आयटी, टेलिकॉम, रिटेल आणि बँकिंग क्षेत्रात घट नोंदवली गेली आहे. विमा क्षेत्रात भरतीत ६% वाढली असून फ्रेशर भरती २६% वाढली आहे. एफएमसीजी क्षेत्रात २% वाढ झाली. बँकिंग, क्षेत्रात ९% घट झाली असली तरी युनिकॉर्न कंपन्यांत २९% वाढ झाली आहे.

कोणत्या शहरांमध्ये भरतीत वाढ?

शहर     वाढीचे प्रमाण

  • कोची    ८% 
  • हैदराबाद     ७% 
  • जोधपूर    ७% 
  • कोईम्बतूर    ६% 
  • लखनऊ    ५% 
  • रायपूर    ४% 
  • चेन्नई    ३% 
  • गांधीनगर    ३% 
  • वडोदरा    ३% 
  • कोलकाता    २% 
  • बंगळुरू    २% 
  • उदयपूर    २% 
  • सुरत    १% 
  • रांची    १%


ठळकपणे लक्षात आले की मेट्रो शहरांमध्ये एआय आणि मशिन लर्निंग क्षेत्रात हायरिंगचा वेग सातत्यपूर्ण  आहे. वरिष्ठ पदांवर मागणी ही मागील वर्षभर टिकून आहे, तर फ्रेशर्सची नॉन-टेक क्षेत्रांमध्ये वाढली आहे. हा तरुण प्रतिभेसाठी सकारात्मक संकेत आहे.
- डॉ. पवन गोयल, मुख्य व्यवसाय अधिकारी, नोकरी

Web Title: Demand for experienced employees in senior positions in the fields of Artificial Intelligence, Machine Learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.