Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >क्रिप्टोकरन्सी > झोपेतच नशीब चमकलं! अचानक खात्यात ट्रान्सफर झाले ₹१५०००००००००० चे बिटकॉइन; २४९ लोक बनले श्रीमंत, प्रकरण काय?

झोपेतच नशीब चमकलं! अचानक खात्यात ट्रान्सफर झाले ₹१५०००००००००० चे बिटकॉइन; २४९ लोक बनले श्रीमंत, प्रकरण काय?

Bitcoin News: क्रिप्टोच्या जगात कधीकधी अशा घटना घडतात ज्या स्वप्नासारख्या वाटतात. झोपेतच काही लोकांचं नशीब असं चमकलं की ते मालामाल झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 09:46 IST2026-02-09T09:44:06+5:302026-02-09T09:46:57+5:30

Bitcoin News: क्रिप्टोच्या जगात कधीकधी अशा घटना घडतात ज्या स्वप्नासारख्या वाटतात. झोपेतच काही लोकांचं नशीब असं चमकलं की ते मालामाल झाले.

Luck struck while sleeping Suddenly rs 1500000000 Bitcoin was transferred to the account; 249 people became rich Bithumb exchange human error | झोपेतच नशीब चमकलं! अचानक खात्यात ट्रान्सफर झाले ₹१५०००००००००० चे बिटकॉइन; २४९ लोक बनले श्रीमंत, प्रकरण काय?

झोपेतच नशीब चमकलं! अचानक खात्यात ट्रान्सफर झाले ₹१५०००००००००० चे बिटकॉइन; २४९ लोक बनले श्रीमंत, प्रकरण काय?

Bitcoin News: क्रिप्टोच्या जगात कधीकधी अशा घटना घडतात ज्या स्वप्नासारख्या वाटतात. दक्षिण कोरियातील नामांकित क्रिप्टो एक्सचेंज 'बिथम' (Bithumb) वर अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका मानवी चुकीमुळे २४९ युजर्स अवघ्या काही वेळात करोडपती बनले. एका प्रमोशनल इव्हेंट दरम्यान झालेल्या या गोंधळामुळे केवळ एक्सचेंजची अडचण झाली नाही, तर काही काळासाठी संपूर्ण क्रिप्टो मार्केट हादरलं.

नेमकी कशी झाली ही मोठी चूक?

बिथम एक्सचेंजने एका प्रमोशनल इव्हेंट अंतर्गत युजर्सना बक्षिसं देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. यादरम्यान एका कर्मचाऱ्याकडून टायपिंगमध्ये मोठी चूक झाली. त्यानं कोरियन वॉन (चलन) ऐवजी पेमेंट युनिटमध्ये चुकून BTC (बिटकॉइन) टाइप केलं. याचा परिणाम असा झाला की, शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास २४९ युजर्सच्या खात्यात एकूण ६,२०,००० बिटकॉइन ट्रान्सफर झाले.

Punjab National Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७७,९४५ चं फिक्स व्याज, मिळणार सरकारची गॅरेंटी

प्रत्येक युजरला मिळाले हजारो कोटी रुपये

या चुकीमुळे प्रत्येक युजरला सरासरी २,४९० बिटकॉइन मिळाले. त्या वेळी एका युजरला मिळालेल्या बिटकॉइनची किंमत सुमारे १६६ दशलक्ष डॉलर (जवळपास १,५०० कोटी रुपये) इतकी होती. खात्यात एवढी मोठी रक्कम पाहून अनेक युजर्स थक्क झाले, तर काहींनी संधीचा फायदा घेत तातडीनं बिटकॉइनची विक्री सुरू केली.

बिटकॉइनच्या किमतीत खळबळ

युजर्सनी मोठ्या प्रमाणात बिटकॉइन विकण्यास सुरुवात केल्यामुळे बाजारात अचानक पुरवठा वाढला आणि बिटकॉइनच्या किमतीत वेगानं घसरण झाली. ही घसरण काही काळासाठी असली तरी, यामुळे एक्सचेंजच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न निर्माण झालेत.

१२५ बिटकॉइन अजूनही गायब

जेव्हा बिथमच्या ही चूक लक्षात आली, तेव्हा कंपनीने ३५ मिनिटांच्या आत ट्रेडिंग आणि पैसे काढण्यावर बंदी घातली. एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ६,१८,२१२ बिटकॉइन यशस्वीरित्या परत मिळवले आहेत. युजर्सनी विकलेल्या बिटकॉइनपैकी ९३ टक्के रिकव्हरी झाली आहे, मात्र तरीही १२५ बिटकॉइन अजूनही परत मिळालेले नाहीत.

नुकसान भरपाईची घोषणा

या घटनेमुळे ग्राहकांचं सुमारे १ अब्ज वॉनचं नुकसान झाल्याचं बिथमनं मान्य केलंय. ज्या युजर्सचं नुकसान झालं आहे, त्यांना पूर्ण भरपाई देण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं. याशिवाय, एक्सचेंजने १० टक्के अतिरिक्त बोनस आणि एक आठवड्यापर्यंत सर्व लिस्टेड मालमत्तांवर ट्रेडिंग फी माफ करण्याची घोषणा केली आहे. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी बिथमने व्हेरिफिकेशन सिस्टम मजबूत करण्यासाठी एआय (AI) टूल्सची मदत घेण्याची योजना आखली आहे.

Web Title : बिटकॉइन धमाका: टाइपिंग की गलती से 249 लोग रातोंरात बने करोड़पति

Web Summary : बिथम एक्सचेंज पर एक टाइपिंग की गलती के कारण 249 उपयोगकर्ताओं को भारी मात्रा में बिटकॉइन मिल गया, जिससे वे कुछ समय के लिए करोड़पति बन गए। त्रुटि के कारण बाजार में अस्थिरता आई, जिसके बाद एक्सचेंज ने ट्रेडिंग रोक दी और अधिकांश बिटकॉइन बरामद कर लिए, नुकसान के लिए मुआवजे का वादा किया।

Web Title : Bitcoin Bonanza: Typo Turns 249 Users into Overnight Millionaires

Web Summary : A typing error on the Bithumb exchange mistakenly credited 249 users with a massive amount of Bitcoin, briefly making them millionaires. The error caused market volatility before the exchange froze trading and recovered most of the Bitcoin, promising compensation for losses.