The country's manufacturing sector PMI declined | देशातील उत्पादन क्षेत्राच्या पीएमआयमध्ये झाली घट

देशातील उत्पादन क्षेत्राच्या पीएमआयमध्ये झाली घट

नवी दिल्ली : देशाच्या उत्पादन क्षेत्राची प्रगती मोजण्याचे एक साधन मानले जात असलेला परचेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) जाहीर झाला आहे. लॉकडाऊनमुळे कारखान्यांमधील कमी उपस्थिती व कमी झालेले उत्पादन व यामुळे कमी होत असलेली खरेदी यामुळे जुलै महिन्यामध्ये हा निर्देशांक कमी झाला आहे. सलग चौथ्या महिन्यामध्ये या निर्देशांकामध्ये घट झाली आहे.

आयएचएस मार्किट या संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणानंतर दरमहा पीएमआयची आकडेवारी जाहीर केली जाते. देशाचा जुलै महिन्याचा पीमआय ४६ असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. जून महिन्यामध्ये देशातील उत्पादन क्षेत्राचा पीएमआय हा ४७.२ होता. त्यापेक्षा जुलै महिन्याचा निर्देशांक खाली आला आहे. पीएमआयमध्ये घट होण्याचा हा सलग चौथा महिना आहे. पीएमआय ५० पेक्षा अधिक असल्यास त्यामुळे अर्थव्यवस्था वाढीच्या मार्गावर असल्याचे समजून येते, तर ५० पेक्षा कमी असलेला पीएमआय अर्थव्यवस्थेची घसरण सुरू असल्याचे स्पष्ट करीत असतो.
भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या पीएमआयने याआधी सलग ३२ महिने वाढ दाखविली होती. मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस जाहीर झालेल्या देशव्यापी लॉकडाऊननंतर एप्रिल महिन्यापासून हा निर्देशांक घसरत असलेला दिसून येतो आहे. एप्रिलमध्ये २७.४ असलेला हा निर्देशांक मे महिन्यामध्ये थोडा वाढून ३०.८ वर आला. त्यानंतर जूनमध्येही तो वाढला.

कर्मचारी संख्येत कपात

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उत्पादकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे सुरूच ठेवल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. मात्र भविष्यामध्ये परिस्थिती सुधारण्याबाबत आशा आहे.

परिस्थिती पूर्वपदावर येण्याला लागेल आणखी वेळ
च्देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे. तोपर्यंत देशाच्या उत्पादन क्षेत्रामधील मंदीचा प्रभाव कायम राहण्याची चिन्हे या आकडेवारीवरून स्पष्टपणे जाणवत असल्याचे आयएचएसचे अर्थतज्ज्ञ एलिआॅट केर यांनी स्पष्ट केले आहे.

च्जून महिन्याच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये संकुचन वाढण्याचे कारण हे काही राज्यांमध्ये वाढविण्यात आलेले लॉकडाऊन असल्याचे केर यांनी स्पष्ट केले. यामुळे मागणी उत्पादनांना असलेली मागणी कमी झाली असून, निर्यातही कमी होत आहे. आंतरराष्टÑीय क्षेत्रामधूनही आॅर्डर कमी झाल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The country's manufacturing sector PMI declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.