cars24 lays off : गेल्या काही महिन्यांपासून वाहन क्षेत्राचा कठीण काळ चालू आहे. नुकतेच मारुती सुझुकी कंपनीचे तिमाही निकाल समोर आले. देशात सर्वाधिक वाहनांची विक्री करणाऱ्या कंपनीच्या नफ्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे टॅरिफचा टांगती तलावर असल्याने टाटा मोटर्सपासून अनेक ऑटो कंपन्यांचे शेअर कोसळले आहेत. याचा परिणाम आता वाहन पूरक उद्योगांवरही होताना दिसत आहे. वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या Cars24 या कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. Cars24 ने विविध विभागांमधील सुमारे २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
गेल्या वर्षी देखील सुमारे ३० स्टार्टअप्सनी ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. यापैकी ६० टक्के लोकांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. Cars24 ला सॉफ्टबँककडूनही निधी मिळाला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे, त्यांना आउटप्लेसमेंट सेवा तसेच सेव्हेरन्स पॅकेजेस दिले जात आहेत.
२०१५ मध्ये विक्रम चोप्रा, रुचित अग्रवाल, गजेंद्र जांगिड आणि मेहुल अग्रवाल यांनी या कंपनीची स्थापा केली. कार्स २४ वापरलेल्या कार खरेदी आणि विक्रीसाठी एक ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, स्टार्टअपने 'नवीन कार' बाजारातही प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच, कंपनीने देशांतर्गत ऑटोमोटिव्ह फोरम टीम-बीएचपी विकत घेतले होते. वास्तविक, कंपनीने अद्याप त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
सह-संस्थापकांकडून टाळेबंदीला दुजोरा
कार्स२४ चे सह-संस्थापक विक्रम चोप्रा यांनी कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या बातमीला दुजोरा दिला. विक्रम चोप्रा यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. ते म्हणतात की कंपनीतील पुनर्रचनेमुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. 'गेल्या काही आठवड्यांमध्ये, आम्हाला विविध कामांमधील आमच्या जवळजवळ २०० सहकाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला आहे,' असे चोप्रा यांनी लिहिले आहे. चोप्रा म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत काही प्रकल्पांनी अपेक्षित निकाल दिले नाहीत, परिणामी काही पदे घाईघाईने भरावी लागली.
वाचा - परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
चोप्रा यांनी लिहिले, 'आम्ही नेहमीच वेगाने पुढे जाण्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही नेहमीच काहीतरी मोठे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण कटू सत्य हे आहे की स्पष्टतेशिवाय वेग खूप महाग असतो. आणि जेव्हा गणित जुळत नाही, तेव्हा ते रीसेट करणे आपले काम आहे.