Lokmat Money > बिझनेस न्यूज > Business Idea: नोकरी करता करता सुरु करा हा व्यवसाय; 1 लाखांपर्यंत फायदा, केंद्राकडून 80 टक्के कर्ज

Business Idea: नोकरी करता करता सुरु करा हा व्यवसाय; 1 लाखांपर्यंत फायदा, केंद्राकडून 80 टक्के कर्ज

business idea for Extra income: आजच्या काळात दुसरे उत्पन्न स्त्रोत तयार करणे महत्वाचे आहे. आज रिअल इस्टेट क्षेत्र मंदावलेले आहे. तरीदेखील मालमत्तांची खरेदी विक्री सुरु आहे. यामुळे सेवा क्षेत्रातील हा व्यवसाय चांगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 07:08 PM2021-10-16T19:08:19+5:302021-10-16T19:20:32+5:30

business idea for Extra income: आजच्या काळात दुसरे उत्पन्न स्त्रोत तयार करणे महत्वाचे आहे. आज रिअल इस्टेट क्षेत्र मंदावलेले आहे. तरीदेखील मालमत्तांची खरेदी विक्री सुरु आहे. यामुळे सेवा क्षेत्रातील हा व्यवसाय चांगला आहे.

business idea for Extra income; you can start Wooden Furniture Business, earn up to 1 lakhs | Business Idea: नोकरी करता करता सुरु करा हा व्यवसाय; 1 लाखांपर्यंत फायदा, केंद्राकडून 80 टक्के कर्ज

Business Idea: नोकरी करता करता सुरु करा हा व्यवसाय; 1 लाखांपर्यंत फायदा, केंद्राकडून 80 टक्के कर्ज

कोरोना काळाने अनेकांना सेकंड इन्कम का असावा हे शिकविले आहे. अनेकांचे उत्पन्न प्रभावित झाले आहे. नोकरी करणारा, उद्योग करणारा किंवा कामगार वर्ग सारेच त्रस्त झाले आहेत. अनेकांचे अधिकची कमाई (extra income) करण्याकडे लक्ष आहे. बाजारात अनेक पर्याय आहेत. परंतू तुम्हाला कोणती बिझनेस आयडिया (Business idea) आवडते यावर सारे आहे. 

वुडन फर्निचरच्या व्य़वसायाद्वारे (Wooden Furniture Business) तुम्ही चांगली कमाई करू शकता. हा एक चांगला नफ्यातील व्यवसाय आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये तुम्हाला केंद्र सरकारकडून कर्जही मिळते. मोदी सरकार मुद्रा योजनेतून (Mudra scheme) छोट्या उद्योगासाठी 75 ते 80 टक्के बिझनेस लोन म्हणजेच मुद्रा लोन देखील देते. या स्कीम अंतर्गत तुम्ही आपला व्यवसाय सुरु करून कमाई करू शकता. 

फर्निचरचा हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याकडे 1.85 लाख रुपये असणे गरजेचे आहे. मुद्रा योजनेतून बँकेकडून केंद्र सरकारच्या हमीवर 7.48 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. यामध्ये फिक्स कॅपिटल म्हणून 3.65 लाख रुपये आणि तीन महिन्यांच्या वर्किंग कॅपिटलसाठी 5.70 लाख रुपयांची गरज लागेल. हा व्यवसाय सुरु केल्यावर तुम्हाला फायदा देखील सुरु होईल. सर्व खर्च वजा केल्यावर तुम्हाला 60000 ते 1 लाखापर्यंत फायदा होईल. 

आजच्या काळात दुसरे उत्पन्न स्त्रोत तयार करणे महत्वाचे आहे. आज रिअल इस्टेट क्षेत्र मंदावलेले आहे. तरीदेखील मालमत्तांची खरेदी विक्री सुरु आहे. अनेकजण त्यांच्या घरातील फर्निचर बदलणे किंवा नव्या घरात नवीन फर्निचर करणे आदी कामे करत असतात. याचा फायदा हा व्यवसाय करणाऱ्यांना होईल. 

Web Title: business idea for Extra income; you can start Wooden Furniture Business, earn up to 1 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा