BSNL defeats Reliance Jio in Month of December, Earn highest New customers | रिलायन्स जिओला धोबीपछाड देत बीएसएनएलने मिळवले सर्वाधिक नवे ग्राहक

रिलायन्स जिओला धोबीपछाड देत बीएसएनएलने मिळवले सर्वाधिक नवे ग्राहक

ठळक मुद्देडिसेंबर २०१९ मध्ये बीएसएनएलने इतर टेलिकॉम ऑपरेटर्सपेक्षा सर्वाधिक ग्राहक मिळवले विविध कंपन्यांनी प्रीपेड टेरिफ प्लानमध्ये वाढ केल्याने त्याचा सर्वाधिक लाभ बीएसएनएलला झालाव्होडाफोन-आयडिया तसेच भारती एअरटेल आणि एमटीएनएलनेही आपले ग्राहक गमावले

नवी दिल्ली - अडचणीत असलेली सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला गत डिसेंबरमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. डिसेंबर महिन्यात विविध कंपन्यांनी प्रीपेड टेरिफ प्लानमध्ये वाढ केल्याने त्याचा सर्वाधिक लाभ बीएसएनएलला झाला असून, डिसेंबर २०१९ मध्ये बीएसएनएलने इतर टेलिकॉम ऑपरेटर्सपेक्षा सर्वाधिक ग्राहक मिळवले आहेत. बीएसएनएलनंतर सर्वाधिक ग्राहक रिलायन्स जिओने मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे जिओची सुरुवात झाल्यापासून डिसेंबर २०१९ मध्ये प्रथमच जिओला ५ दशलक्षपेक्षा कमी नवे ग्राहक मिळाले आहेत.

 बीएसएनएलला डिसेंबर महिन्यात ४.२ लाख नवे ग्राहक मिळाले. मात्र याच महिन्यात रिलायन्स जिओला केवळ ८२ हजार ३०८ नवे ग्राहक मिळाले. दुसरीकडे व्होडाफोनआयडियाचे ग्राहक या महिन्यातही कमी झाले. तसेच भारती एअरटेल आणि एमटीएनएलनेही आपले ग्राहक गमावले.  

 मात्र असे असले तरी टेलिकॉम मार्केटमध्ये रिलायन्स जिओची सर्वाधिक हिस्सेदारी कायम आहे. रिलायन्स जिओने सप्टेंबर २०१६ मध्ये बाजारात प्रवेश केल्यापासून प्रत्येक महिन्यात सरासरी पाच दशलक्ष ग्राहक मिळवले होते.  मात्र गतवर्षाच्या अखेरीस टॅरिफमधील वाढ आणि आययूसीमुळे प्रथमच रिलायन्स जिओकडे असलेला ग्राहकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर आटल्याचे दिसून आले. तरीही टेलिकॉम मार्केटमध्ये रिलायन् जिओची सर्वाधिक हिस्सेदारी कायम आहे. सध्या टेलिकॉम मार्केटमध्ये जिओची हिस्सेदारी ३२.१४ एवढी आहे.

बीएसएनएलने डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ४ लाख २७ हजार ८९ नवे ग्राहक मिळवले आहेत. सर्वाधिक ग्राहक मिळवण्याच्या बाबतीत बीएसएनएलने जिओला प्रथमच मागे टाकले आहे. बीएसएनएलची टेलिकॉम मार्केटमधील भागीदारी १०.२६ टक्के आहे. डिसेंबर २०१९ मध्ये खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सनी आपल्या प्रीपेड टॅरिफमध्ये ४० टक्क्यांपर्यंतची वाढ केली होती. मात्र बीएसएनएलने काही ठराविक सर्कलमध्ये व्हॅलिडिटी कमी करण्याशिवाय टॅरिफमध्ये काहीही बदल केलेला नाही. त्यामुळे अधिकाधिक नवे ग्राहक बीएसएनएलकडे वळले आहेत.

दुसरीकडे व्होडाफोन-आयडियाची मात्र या महिन्यातही घसरण सुरू राहिली. व्होडाफोन-आयडियाने डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ग्राहक गमावले. डिसेंबर २०१९ मध्ये त्यांचे ३६ लाख ग्राहक व्होडाफोन आयडियाने गमावले. तर एअरटेलनेसुद्धा ११ हजार ग्राहक गमावले. एकंदरीत पाहता प्रीपेड टॅरिफमधील वाढीचा सर्वाधिक फटका व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलला बसला आहे.

संबंधित बातम्या 

बीएसएनएलच्या मालमत्ता विक्रीतून मिळणार २५ हजार कोटी

व्होडाफोन-आयडियाची मोदी सरकारला मोठ्ठी ऑफर; 1 रुपयांत कंपनीच घ्या!

BSNLमध्ये १ हजार नोकऱ्या; महाराष्ट्रभरात भरती, पुण्यात सर्वाधिक जागा

बीएसएनएलची फोरजी सेवा ऑक्टोबरपासून कार्यान्वित

टेलिकॉम क्षेत्रातील मार्केट शेअरचा विचार केल्यास याबाबतीत रिलायन्स जिओचा दबदबा दिसून येत आहे. जिओचे मार्केट शेअर ३२.१४ टक्के आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्होडाफोन-आयडियाचा वाटा २८.८९ टक्के आहे. २८.४३ टक्के मार्केट शेअरसह एअरटेल तिसऱ्या स्थानावर आहे.  तर १०.२६ टक्के मार्केट शेअरसह बीएसएनएल चौथ्या क्रमांकावर आहे.  

English summary :
BSNL Earn highest New customers in Month of December, Reliance Jio Second in list. But Vodafone-Idea & Airtel lost their customers.

Web Title: BSNL defeats Reliance Jio in Month of December, Earn highest New customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.