Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bombay Oxygen Investments: नावात काय आहे? नावावरच गुंतवणूकदार भुलले; 'या' शेअरमध्ये तब्बल १५० टक्के वाढ

Bombay Oxygen Investments: नावात काय आहे? नावावरच गुंतवणूकदार भुलले; 'या' शेअरमध्ये तब्बल १५० टक्के वाढ

Bombay Oxygen Investments: या कंपनीच्या नावात ऑक्सिजन असल्याने गुंतवणूकदार या शेअरकडे आकर्षित झाले असल्याचे म्हटले जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:53 PM2021-04-20T16:53:47+5:302021-04-20T16:56:04+5:30

Bombay Oxygen Investments: या कंपनीच्या नावात ऑक्सिजन असल्याने गुंतवणूकदार या शेअरकडे आकर्षित झाले असल्याचे म्हटले जात आहे. 

bombay oxygen investments share increased 150 percent in three months | Bombay Oxygen Investments: नावात काय आहे? नावावरच गुंतवणूकदार भुलले; 'या' शेअरमध्ये तब्बल १५० टक्के वाढ

Bombay Oxygen Investments: नावात काय आहे? नावावरच गुंतवणूकदार भुलले; 'या' शेअरमध्ये तब्बल १५० टक्के वाढ

Highlightsकेवळ नावामुळे कंपनीचे शेअर्स १५० टक्क्यांनी वाढलेशेअरला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किटगुंतवणूकदार तज्ज्ञही चक्रावले

मुंबई: थोर विचारवंत, लेखक शेक्सपियर यांनी नावात काय आहे, असे म्हटले आहे. मात्र, नावातच सर्व गोष्टी असल्याचा अनुभव शेअर मार्केटमधील एका कंपनीला आणि गुंतवणूकदारांना आल्याचे पाहायला मिळत आहे. देशात एकीकडे कोरोनाचा कहर कायम असताना, दुसरीकडे मात्र, शेअर बाजारातील रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. म्हणूनच गुंतवणूकदारांचा ओढा या कंपन्यांकडे वाढला आहे. केवळ नावावरून गुंतवणूकदारांनी अशा नावाच्या शेअर्समध्ये सरसकट गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये तीन महिन्यांत तब्बल १५७ टक्के वाढ झाली आहे. (bombay oxygen investments share increased 150 percent in three months)

बिगर बँकिंग वित्त सेवा पुरवठादार असलेल्या 'बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट' या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या तीन महिन्यात तब्बल १५७ टक्के वाढ झाली आहे. नावात ऑक्सिजन असल्याने गुंतवणूकदारांमध्ये कंपनीच्या शेअरचे आकर्षण वाढले आहे. १ फेब्रुवारी २०२१ रोजी 'बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट'चा शेअर ९ हजार ९६५ रुपये होता. यानंतर या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर तब्बल २४ हजार ५७४ रुपयांवर गेला आहे.

सीरमला ३ हजार कोटी देणार; लस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्राचा निर्णय

शेअरला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट

सोमवारी भांडवली बाजार कोसळत असताना या कंपनीच्या शेअरला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. 'बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट' औद्योगिक वापराकरीता गॅस पुरवठा करत होती. मात्र ऑगस्ट २०१९ पासून हा व्यवसाय बंद केला असून बिगर बँकिंग वित्त पुरवठा क्षेत्रात कंपनीने विस्तार केला आहे. एप्रिल महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये १२० टक्के वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर ११ हजार २५५ रुपये होता. आता या शेअरची किंमत २४ हजार ५७४ रुपये झाली आहे. यामुळे गुंतवणूक तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

दरम्यान, कंपनीने २०१८ मध्ये नावात बदल केला. कंपनीची रिझर्व्ह बँकेकडे बिगर बँकिंग वित्त संस्था म्हणून नोंदणी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध राज्यांमधील कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे काही राज्यांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, कंपनीच्या व्यवसायाची खातरजमा न करता गुंतवणूकदारांनी 'बॉम्बे ऑॅक्सिजन इन्व्हेस्टमेंट'च्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. 'बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट' या कंपनीच्या नावात ऑक्सिजन असल्याने गुंतवणूकदार या शेअरकडे आकर्षित झाले असल्याचे म्हटले जात आहे. 
 

Web Title: bombay oxygen investments share increased 150 percent in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.