Lokmat Money > बिझनेस न्यूज > बायडेन धमाका! शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच 50000 पार

बायडेन धमाका! शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच 50000 पार

Share Market boost news: अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष जो बायडेन यांनी बुधवारी 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेत आता बायडेन युगाची सुरुवात झाली. या सत्तांतरावर जगभराची नजर होती. बायडेननी पदभर स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांवर कडक भूमिका घेतली. तसेच हे निर्णय बदलले. यामुळे भारतीय़ गुंतवणूकदारही भारावले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 10:20 AM2021-01-21T10:20:05+5:302021-01-21T10:20:32+5:30

Share Market boost news: अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष जो बायडेन यांनी बुधवारी 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेत आता बायडेन युगाची सुरुवात झाली. या सत्तांतरावर जगभराची नजर होती. बायडेननी पदभर स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांवर कडक भूमिका घेतली. तसेच हे निर्णय बदलले. यामुळे भारतीय़ गुंतवणूकदारही भारावले आहेत. 

Big jump in the stock market; Sensex crossed 50,000 for the first time | बायडेन धमाका! शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच 50000 पार

बायडेन धमाका! शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच 50000 पार

शेअर बाजारात गुरुवारी ऐतिहासिक वाढ पहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्सने पहिल्यांदाच 50000 चा आकडा पार केला. गुरुवारी जेव्हा शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स 50,096.57 आणि निफ्टी 14730 वर सुरु झाला. 


अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष जो बायडेन यांनी बुधवारी 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेत आता बायडेन युगाची सुरुवात झाली. या सत्तांतरावर जगभराची नजर होती. बायडेननी पदभर स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांवर कडक भूमिका घेतली. तसेच हे निर्णय बदलले. यामुळे भारतीय़ गुंतवणूकदारही भारावले आहेत. 
 

रिलायन्स, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकांसारख्या शेअरमुळे सेन्सेक्स पहिल्यांदाच 50 हजार पार गेला आहे. जे के टायरच्या शेअरमध्ये सर्वाधिक 9 टक्क्यांची वाढ झाली. सेन्सेक्सवरील 30 शेअरपैकी 27 शेअर वाढीने खुले झाले. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हमध्ये 4 आणि 3 टक्क्यांची वाढ झाली. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर या कंपन्यांचे शेअर वाढतच आहेत. बजाज ऑटो आज डिसेंबर तिमाहीच्या निकालांची घोषणा करणार आहे. 


बुधवारीही सेन्सेक्स तेजीत
अमेरिकेत नवीन सरकार स्थापने होणार आणि बायडेन यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमुळे जागतीक शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली होती. आयटी, ऊर्जा, वाहन कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ दिसताच भारतीय बाजारातही बुधवारी तेजी दिसून आली. बीएसईचा 30 शेअरांचा सेन्सेक्स 393.83 अंकांनी म्हणजेच 0.80 टक्क्यांनी वाढला होता. यामुळे बुधवारी शेअरबाजार 49,792.12 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 123.55 अंकांनी वाढून 14,644.70 स्तरावर बंद झाला होता. 

मोदींनी केले अभिनंदन...

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे अभिनंदनही केलंय. तसेच, बायडन यांच्यासमवेत काम करत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील भागिदारीला एका विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी संकल्पित आहे. भारत व अमेरिकेची भागिदारी आपल्यासाठी लाभदायक असल्याचंही मोदी म्हणाले. दरम्यान, हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचेही मोदींनी अभिनंदन केले. 

Web Title: Big jump in the stock market; Sensex crossed 50,000 for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.