आज बुधवार, ९ जुलै रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ८३७ रुपयांनी आणि चांदी १३७ रुपयांनी घसरली आहे. २४ कॅरेट सोनं आज ९६,१३५ रुपयांवर उघडलं. जीएसटीसह २४ कॅरेट सोनं ९९,०१९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे, तर चांदी १,१०,५८३ रुपये प्रति किलोनं विकली जात आहे.
आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंदेखील ८३४ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९५,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता ९८६२२ रुपये झाली आहे. त्यात अद्याप मेकिंग चार्ज समाविष्ट नाही.
संपूर्ण कर्ज फेडणार ही कंपनी; 'या' ज्वेलरी कंपनीच्या शेअरमध्ये ५०० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी
दागिन्यांसाठी जारी केलेल्या दरांबद्दल बोलायचं झाले तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत ९३८३ रुपये प्रति ग्रॅम आहे. आज २० कॅरेट सोन्याची किंमत ८५५६ रुपये आणि १८ कॅरेटची किंमत ७७८७ रुपये प्रति ग्रॅमवर आली आहे.
भारतीय बाजारपेठेवर रुपयाचा परिणाम
रुपया मजबूत झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतींवर दबाव दिसून आला. एलकेपी सिक्युरिटीजचे विश्लेषक जतिन त्रिवेदी यांच्या मते, रुपयात ०.२३% वाढ झाल्यानं सोन्याच्या किमती आणखी खाली आल्या, कारण रुपया मजबूत असल्यानं आयात केलेलं सोनं स्वस्त होतं.