Prepaid Mobile Plans : किंमत वाढल्यानंतर हे आहेत Jio, Airtel, Vi चे २०० रूपयांपेक्षा स्वस्त आणि मस्त प्लॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 04:09 PM2021-12-01T16:09:14+5:302021-12-01T16:10:31+5:30

Airtel, Vodafone-Idea आणि त्यानंतर Reliance Jio यांनी नुकतीच रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली.

best prepaid plans under 200 rupees in india jio vs airtel vs vi know which one is better | Prepaid Mobile Plans : किंमत वाढल्यानंतर हे आहेत Jio, Airtel, Vi चे २०० रूपयांपेक्षा स्वस्त आणि मस्त प्लॅन्स

Prepaid Mobile Plans : किंमत वाढल्यानंतर हे आहेत Jio, Airtel, Vi चे २०० रूपयांपेक्षा स्वस्त आणि मस्त प्लॅन्स

Next

एअरटेलने (Airtel) अलीकडेच आपल्या सर्व प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. ज्यानंतर Vodafone-Idea ने देखील आपले प्रीपेड प्लान महाग केले आहेत आणि आता Reliance Jio ने देखील आपल्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या. अशा स्थितीत ग्राहकांसाठी स्वत:साठी स्वस्त आणि परवडणारे प्लॅन्स शोधणं थोडं कठीण झालंय. अशा परिस्थितीत, आज रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) च्या २०० रुपयांपेक्षा कमी प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

Airtel १७९ रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या १४९ रुपयांच्या प्लॅनची किंमत आता १७९ रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि त्यात अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि २८ दिवसांच्या वैधतेसह २ जीबी डेटा येतो. यासोबतच ग्राहकांना Amazon Prime Video mobile व्हर्जन, Wynk म्युझिक आणि अनलिमिटेड हॅलो ट्युनचं सबस्क्रिप्शन मिळतं.

१५५ रूपयांचा प्लॅन
एअरटेलच्या १५५ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २४ दिवसांसाठी १ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यासोबत मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएसची सुविधाही देण्यात येते. यासोबतच ग्राहकांना Amazon Prime Video mobile व्हर्जन, Wynk म्युझिक आणि अनलिमिटेड हॅलो ट्युनचं सबस्क्रिप्शन मिळतं.

Vodafone Idea Plans
१७९ रूपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ आणि २८ दिवसांकरिता २ जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय ग्राहकांना ३०० एसएमएसचा लाभ मिळतो. परंतु यात बिंज ऑल नाईट, विकेंड डेटा रोलओव्हरसारख्या सुविधा मात्र मिळत नाहीत.

१९९ रूपयांचा प्लॅन
व्होडाफोन आयडियाचा हा प्लॅन १८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधाही देण्यात येते. याशिवाय Vi Movies & TV चा अॅक्सेसही देण्यात येतो.

Reliance Jio Plans
जिओचा १५५ रुपयांचा प्लॅन

Jio च्या २०० रुपयांपेक्षा कमी नव्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल सांगायचं झालं तर, १५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २ जीबी डेटा आणि एकूण ३०० एसएमएस देण्यात येतात. या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. यासह ग्राहकांना JioTV, JioCinema, JioNews आणि JioSecurity यासह इतर अनेक Jio अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळतं.

१७९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी हायस्पीड डेटा देण्यात येतो. तसंच लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी केला जातो. या प्लॅनची वैधता २४ दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह मोफत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

Web Title: best prepaid plans under 200 rupees in india jio vs airtel vs vi know which one is better

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app