Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय

तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय

best investment plans : जर तुमची मुलगी अजूनही लहान असेल आणि तुम्हाला तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी ३ चांगले पर्याय घेऊन आलो आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 12:50 IST2025-05-11T12:50:26+5:302025-05-11T12:50:26+5:30

best investment plans : जर तुमची मुलगी अजूनही लहान असेल आणि तुम्हाला तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी ३ चांगले पर्याय घेऊन आलो आहोत.

best investment plans to collect lakhs of rupees for daughter marriage | तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय

तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय

best investment plans : प्रत्येक पालकाला आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता असते. शिक्षण आणि विवाह ह्या २ मोठ्या जबाबदाऱ्या पालकांच्या खांद्यावर असतात. वाढती महागाई लक्षात घेऊन, प्रत्येक पालकाने आपल्या मुलीच्या बालपणापासूनच गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे. जेणेकरून मुलगी मोठी होईपर्यंत चांगला निधी जमा होऊ शकेल. जर तुमची मुलगी अजूनही लहान असेल आणि तुम्हाला तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल. तर आज आम्ही तुम्हाला अशा ३ गुंतवणूक पर्यायांबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही दरमहा थोडी गुंतवणूक करून लाखो रुपयांचा निधी गोळा करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना (SSY)
सुकन्या समृद्धी योजना ही एक सरकारी योजना आहे. सरकारची योजना असल्यामुळे जोखीम शून्य आहे. या योजनेत वय वर्ष १० च्या आतील मुलीच्या नावे गुंतवणूक करता येते. तुम्ही दरवर्षी १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्हाला ही गुंतवणूक १५ वर्षांसाठी करावी लागेल. योजनेचा परिपक्वता कालावधी २१ वर्षे आहे. जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी १ लाख रुपये १५ वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला एकूण ८.२ टक्के व्याजदराने परतावा मिळेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ४६,१८,३८५ रुपये मिळतील. यामध्ये, फक्त ३१,१८,३८५ रुपये तुमचे व्याज असेल.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजना
पीपीएफ ही पोस्ट ऑफिसची एक योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही १५ वर्षांसाठी दरवर्षी १.५० लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेवर दरवर्षी व्याजदर घोषित केला जातो. सध्याचा व्याजदर ७.१ टक्के इतका आहे. जर तुम्ही या योजनेत दरवर्षी १५ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २७,१२,१३९ रुपये मिळतील. यापैकी १२,१२,१३९ रुपये फक्त तुमचे व्याज असेल. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्राप्तीकरात सूट मिळते.

वाचा - UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा

म्युच्युअल फंडात एसआयपी
म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक हा देखील एक उत्तम पर्याय आहे. ही योजना शेअर बाजाराशी जोडलेली असल्यामुळे जोखीम आहे. पण, जर दीर्घकाळ गुंतवणूक केली तर ही जोखीम खूप कमी होते. यात सरासरी १२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. जर तुम्ही १५ वर्षांसाठी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा ८००० रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ३८,०७,४५१ रुपये मिळतील. यामध्ये, एकूण २३,६७,४५१ रुपये फक्त तुमचा नफा असेल.

Web Title: best investment plans to collect lakhs of rupees for daughter marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.