flexi personal loan : कर्ज आणि भारतीय असं समीकरण दिवसेंदिवस दृढ होत चाललं आहे. सध्या बाजारात विविध प्रकारच्या कर्जाचे पर्याय उपलब्ध आहेत. देशात प्रत्येक १० पैकी ५ लोक कर्ज घेत आहेत. तुम्हीही कधी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर यासंबंधी माहिती असायला हवी. जेणेकरुन तुम्हाला सोयीस्कर आणि स्वस्तात कर्ज मिळायला मदत होईल. आज आपण फ्लेक्सी पर्सनल लोन विषयी माहिती घेणार आहोत. हे पूर्व-मंजूर (प्री-अप्रूव्ड) क्रेडिट कर्ज आहे. याद्वारे, कर्जदार त्याच्या गरजेनुसार पैसे काढू शकतो. वापरलेल्या पैशावरच व्याज दिले जाते. आर्थिक संकटात याची खूप मदत होते.
फ्लेक्सी पर्सनल लोन म्हणजे काय?
फ्लेक्सी पर्सनल लोन हा रिव्हॉल्व्हिंग क्रेडिटचा प्रकार आहे. हे कर्ज पूर्व-मंजूर मर्यादेत दिले जाते. कर्जदार या मर्यादेत कधीही पैसे काढू शकतात. याशिवाय, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते परत करू शकता. या कर्जावरील व्याज केवळ वापरलेल्या रकमेवरच आकारले जाते. आर्थिक संकट सयमी हे कर्ज स्वस्त पर्याय असू शकते. हे कर्ज ओव्हरड्राफ्टप्रमाणे काम करते. बँक पूर्व-मंजूर क्रेडिट मर्यादा मंजूर करते. कर्जदार या मर्यादेत कधीही पैसे काढू शकतो.
फ्लेक्सी पर्सनल लोन कोण घेऊ शकतो?
समजा तुम्हाला १ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातले तुम्ही फक्त ४० हजार रुपये वापरले. तर तुम्हाला फक्त ४० हजार रुपयांवरच व्याज भरावे लागेल. यात पैशाच्या वापरावर कोणतेही बंधन नाही. या सुविधेमुळे व्याजाचा खर्च कमी होतो. नोकरदार आणि पगारदार दोघेही या कर्जासाठी पात्र आहेत. ७५० किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. फ्लेक्सी वैयक्तिक कर्जासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहेत. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, युटिलिटी बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट किंवा फॉर्म १६, बँक स्टेटमेंट, ITR यांचा समावेश आहे.
फ्लेक्सी पर्सनल लोन कोणासाठी फायदेशीर?
ज्या लोकांना त्यांचे पैसे चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करायचे आहेत. त्यांच्यासाठी फ्लेक्सी पर्सनल लोन हा उत्तम पर्याय असू शकतो. हे आर्थिक अडचणी हाताळण्यास मदत करते, जसे की शिक्षण किंवा आजारपणाचा खर्च भागवणे. कर्जदाराने कर्जाचा हुशारीने वापर केला तरच त्याचा लाभ मिळू शकतो.