Lokmat Money >बँकिंग > कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 

कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 

स्वत:चं घर विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येकाचंच स्वप्न असतं, परंतु हल्ली प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांना, विशेषत: नोकरी करणाऱ्यांना स्वत:च्या कमाईतून घर खरेदी करणं अत्यंत अवघड झालंय. ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:23 IST2025-06-24T14:22:45+5:302025-06-24T14:23:59+5:30

स्वत:चं घर विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येकाचंच स्वप्न असतं, परंतु हल्ली प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांना, विशेषत: नोकरी करणाऱ्यांना स्वत:च्या कमाईतून घर खरेदी करणं अत्यंत अवघड झालंय. ब

Want to take a home loan at a low interest rate uco bank bank of maharashtra canara bank government banks are the best rates are less than 7 50 percent | कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 

कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 

स्वत:चं घर विकत घेणं हे जवळजवळ प्रत्येकाचंच स्वप्न असतं, परंतु हल्ली प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांना, विशेषत: नोकरी करणाऱ्यांना स्वत:च्या कमाईतून घर खरेदी करणं अत्यंत अवघड झालंय. बहुतेकदा अनेकजण बँकेकडून गृहकर्ज घेऊन घर खरेदी करतात. देशातील विविध बँकांकडून ग्राहकांना वेगवेगळ्या व्याजदरानं गृहकर्ज दिलं जातं. अशा परिस्थितीत तुम्हीही गृहकर्ज घेऊन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ज्या बँकेचे व्याजदर कमी आहेत, अशा बँकेकडून गृहकर्ज घेण्याला प्राधान्य दिलं पाहिजे.

आज आम्ही तुम्हाला अशा काही सरकारी बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना ७.५० टक्क्यांपेक्षा कमी व्याजदरानं गृहकर्ज देत आहेत. चला जाणून घेऊया.

Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्रचा गृहकर्जाचा व्याजदर ७.३५ टक्के आहे. तुमच्या कर्जाची रक्कम, सिबिल स्कोअरच्या आधारे हे व्याजदर बदलू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जासाठी प्रोसेसिंग फी ०.२५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते. बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्येही गृहकर्जाचे व्याजदर ७.३५ टक्क्यांपासून सुरू होतात. कर्जाचा कालावधी, रक्कम आणि सिबिल स्कोअरनुसार हा व्याजदर बदलू शकतो.

कॅनरा बँक

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेच्या व्याजदरांबद्दल बोलायचं झालं तर ही बँक आपल्या ग्राहकांना सुरुवातीच्या ७.४० टक्के व्याजदरानं गृहकर्ज देते. गृहकर्जासाठी प्रोसेसिंग फी ०.५० टक्के इतकी आहे. तुमच्या सिबिल आणि कर्जाच्या रकमेनुसार व्याजदरात फरक असू शकतो.

Web Title: Want to take a home loan at a low interest rate uco bank bank of maharashtra canara bank government banks are the best rates are less than 7 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.