Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे

UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे

personal Loan EMI : पर्सनल लोनचे ईएमआय देण्यासाठी यूपीआय वापरावे की नेट बँकींग याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:48 IST2025-11-05T12:47:01+5:302025-11-05T13:48:58+5:30

personal Loan EMI : पर्सनल लोनचे ईएमआय देण्यासाठी यूपीआय वापरावे की नेट बँकींग याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

UPI vs. Net Banking Which is Better for Personal Loan EMI Payments? Security and Speed Analysis | UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे

UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे

personal Loan : गेल्या दहा वर्षांत भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीने आर्थिक व्यवहारांचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले आहे. आज घरभाडे देणे असो, बिल भरणे असो किंवा पर्सनल लोनचा ईएमआय भरणे असो, सर्वकाही एका 'टॅप'मध्ये शक्य झाले आहे. डिजिटल पेमेंटच्या विविध पर्यायांमध्ये यूपीआय आणि नेट बँकिंग हे सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय माध्यम बनले आहेत.

दोन्ही पद्धती जलद, सुरक्षित आणि कॅशलेस व्यवहाराची सुविधा देतात, पण त्यांची प्रक्रिया आणि वापराचे स्वरूप पूर्णपणे भिन्न आहे. अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की, पर्सनल लोनचा ईएमआय भरण्यासाठी कोणता पर्याय अधिक चांगला ठरू शकतो? यूपीआयची तत्काळ आणि जलद पेमेंट सुविधा, की नेट बँकिंगचे तपशीलवार नियंत्रण आणि उच्च मर्यादा? चला, तुमच्या गरजेनुसार दोन्ही पर्यायांचे विश्लेषण करूया.

नेट बँकिंग म्हणजे काय?

  • इंटरनेट बँकिंग ही अशी सुविधा आहे, ज्याद्वारे तुम्ही बँकेच्या शाखेत न जाता तुमच्या बँक खात्याचे संचालन करू शकता. बँकेची वेबसाइट किंवा मोबाईल ॲप वापरून तुम्ही पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे, एफडी उघडणे, कर्जासाठी अर्ज करणे किंवा ईएमआय शेड्यूल पाहणे अशी अनेक कामे करू शकता.
  • सुरक्षितता: नेट बँकिंग एका मजबूत डिजिटल संरचनेवर आधारित आहे. यात लॉगिन आयडी, पासवर्ड आणि ओटीपी किंवा सिक्युअर टोकनसारखी मल्टी-लेअर ऑथेंटिकेशन सुविधा मिळते.
  • EMI साठी उपयुक्तता: मोठी किंवा पूर्वनियोजित रक्कम (जसे की EMI) हस्तांतरित करण्यासाठी नेट बँकिंग खूप उपयुक्त आहे, कारण येथे सुरक्षितता ही गतीपेक्षा जास्त महत्त्वाची असते.

नेट बँकिंग निवडण्याची प्रमुख कारणे

  • मोठ्या ईएमआय रकमेसाठी सर्वाधिक उपयुक्त.
  • ऑटो-डेबिट सेट करण्याची सुविधा, ज्यामुळे पेमेंटची तारीख कधीही चुकणार नाही.
  • खाते आणि कर्जाशी संबंधित सर्व माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते.
  • मजबूत लॉगिन प्रक्रिया आणि बहु-स्तरीय प्रमाणीकरण.

यूपीआय म्हणजे काय?

  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेले UPI हे एक रिअल-टाइम डिजिटल पेमेंट सिस्टम आहे. हे मोबाईल ॲपद्वारे अनेक बँक खाती जोडते, ज्यामुळे तुम्ही कधीही, कोठूनही तत्काळ पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे रविवार किंवा बँक सुट्ट्यांमध्येही काम करते.
  • UPI मध्ये तुम्हाला बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोडची गरज नसते. त्याऐवजी तुम्ही व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेसद्वारे व्यवहार करू शकता.
  • व्यवहार काही सेकंदांत पूर्ण होतो आणि लगेच पेमेंटची पुष्टी मिळते. यामुळे ईएमआयसारख्या वेळेवर भराव्या लागणाऱ्या पेमेंटसाठी UPI एक चांगला पर्याय ठरतो.

यूपीआय निवडण्याची प्रमुख कारणे

  • सुट्ट्यांमध्येही काही सेकंदांत ट्रान्झॅक्शन पूर्ण होते.
  • नेट बँकिंग लॉगिनची लांबलचक प्रक्रिया नाही; फक्त यूपीआय पिन टाका.
  • त्वरित नोटिफिकेशनद्वारे पेमेंटची पुष्टी होते.
  • एकाच ॲपमध्ये अनेक बँक खाती जोडण्याची सुविधा.

सुरक्षिततेच्या दृष्टीने कोण अधिक प्रभावी?
नेट बँकिंग आणि यूपीआय दोन्हीही आरबीआयच्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालतात आणि मजबूत सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करतात. त्यामुळे दोन्ही माध्यमं सुरक्षित आहेत. फरक फक्त त्यांच्या प्रमाणीकरण प्रक्रियेत आहे.
UPI ची सुरक्षा प्रामुख्याने यूपीआय पिन आणि मोबाईल डिव्हाइस बाइंडिंगवर अवलंबून असते. व्हीपीएमुळे तुमच्या बँक खात्याची संवेदनशील माहिती कधीही दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर होत नाही. बहुतांश फसवणूक तेव्हा होते जेव्हा वापरकर्ता आपला पिन कोणाला शेअर करतो.
नेट बँकिंगमध्ये सामान्यतः मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरले जाते—म्हणजे लॉगिनसाठी पासवर्ड आणि व्यवहाराच्या पुष्टीसाठी ओटीपी. या बहु-स्तरीय संरचनेमुळे अनधिकृत प्रवेश करणे कठीण होते, मात्र यामुळे प्रक्रिया थोडी मंद होते.

वाचा - वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही

निष्कर्ष
नियमित आणि मोठी रक्कम : जर तुमचा ईएमआय मोठा असेल किंवा तुम्हाला ऑटो-डेबिट सेट करायचे असेल, तर नेट बँकिंग अधिक संरक्षित आणि नियोजित पर्याय आहे.
तात्काळ आणि सुविधा : जर तुम्हाला सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री तत्काळ ईएमआय भरायचा असेल आणि तो १ लाखांपेक्षा कमी असेल, तर यूपीआय हा सर्वात जलद आणि सोपा पर्याय आहे.

Web Title : UPI या नेट बैंकिंग: पर्सनल लोन EMI भरने का सबसे अच्छा तरीका?

Web Summary : पर्सनल लोन EMI भुगतान के लिए UPI और नेट बैंकिंग अलग-अलग फायदे प्रदान करते हैं। नेट बैंकिंग बड़ी रकम और स्वचालित भुगतानों के लिए उपयुक्त है। UPI तत्काल लेनदेन प्रदान करता है, छोटे EMI और त्वरित हस्तांतरण के लिए आदर्श, सुविधा और सुरक्षा को संतुलित करता है।

Web Title : UPI or Net Banking: Best way to pay personal loan EMI?

Web Summary : UPI and Net Banking offer distinct advantages for personal loan EMI payments. Net banking suits large amounts and automated payments. UPI provides instant transactions, ideal for smaller EMIs and quick transfers, balancing convenience and security.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.