Lokmat Money >बँकिंग > हजारो कोटींची अनक्लेम्ड अमाऊंट बँकांमध्ये पडून; तुमचे तर नाहीत ना? पटापट चेक करा 'हे' पोर्टल

हजारो कोटींची अनक्लेम्ड अमाऊंट बँकांमध्ये पडून; तुमचे तर नाहीत ना? पटापट चेक करा 'हे' पोर्टल

Unclaimed Amount : दरवर्षी बँकांमध्ये अशी रक्कम तपासली जाते, ज्यावर कोणत्याही व्यक्तीचा दावा नसतो. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) या रकमेची आकडेवारी जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:52 IST2025-01-07T10:52:30+5:302025-01-07T10:52:30+5:30

Unclaimed Amount : दरवर्षी बँकांमध्ये अशी रक्कम तपासली जाते, ज्यावर कोणत्याही व्यक्तीचा दावा नसतो. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) या रकमेची आकडेवारी जाहीर केली आहे.

Thousands of crores of unclaimed amount lying in banks check if that is yours Quickly check this portal | हजारो कोटींची अनक्लेम्ड अमाऊंट बँकांमध्ये पडून; तुमचे तर नाहीत ना? पटापट चेक करा 'हे' पोर्टल

हजारो कोटींची अनक्लेम्ड अमाऊंट बँकांमध्ये पडून; तुमचे तर नाहीत ना? पटापट चेक करा 'हे' पोर्टल

Unclaimed Amount : दरवर्षी बँकांमध्ये अशी रक्कम तपासली जाते, ज्यावर कोणत्याही व्यक्तीचा दावा नसतो. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) या रकमेची आकडेवारी जाहीर केली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२४ पर्यंत देशातील विविध बँकांमध्ये एकूण ७८,२१३ कोटी रुपयांवर कोणीही दावा केलेला नाही. या रकमेवर दावा करणारे कोणीही नाही.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09

दरवर्षी होतेय यात वाढ

वर्षानुवर्ष बँकांमध्ये ही दावा न केलेली रक्कम वाढत आहे. आता आरबीआय या रकमेचं काय करणार याबद्दल बोलायचं झालं तर ही रक्कम आरबीआयकडून डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात (डीईएफएफ) हस्तांतरित केली जाते, ज्याद्वारे या रकमेवर वार्षिक केवळ ३% व्याज मिळतं.

यूडीजीएएम पोर्टल

या न दावा केलेल्या रकमेची समस्या सोडविण्यासाठी आरबीआयनं २०२३ मध्ये यूडीजीएएम पोर्टल सुरू केलं होतं. यूडीजीएएम म्हणजेच अनक्लेम डिपॉझिट्स-गेटवे टू अॅक्सेस इन्फॉर्मेशन पोर्टलच्या माध्यमातून ही रक्कम त्याच्या योग्य मालकापर्यंत पोहोचविणं सोपं आहे. हे पोर्टल एकाच ठिकाणी विविध बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेण्यास मदत करतं.

रिझर्व्ह बँकेनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (REBIT), इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस (IFTAS) आणि त्यात गुंतलेल्या बँकांच्या सहकार्यानं विकसित केलेलं हे वन स्टॉप प्लॅटफॉर्म आहे. देशातील ३० बँका या प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या आहेत, ज्यामध्ये एकूण दावा न केलेल्या ठेवींपैकी ९० टक्के रक्कम शेअर केली जाते.

यामध्ये तुमचीही रक्कम आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पोर्टलवर लॉगिन करावं लागेल आणि आपले बँक डिटेल्स भरावे लागतील. यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रं सबमिट करून तुम्ही तुमच्या डिपॉझिटचे सर्व डिटेल्स पाहू शकता.

Web Title: Thousands of crores of unclaimed amount lying in banks check if that is yours Quickly check this portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.