Lokmat Money >बँकिंग > होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज

होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज

Home Loan Government Banks: जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही आधीच होम लोनचा ईएमआय भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:52 IST2025-07-04T12:51:17+5:302025-07-04T12:52:59+5:30

Home Loan Government Banks: जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही आधीच होम लोनचा ईएमआय भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. दे

Thinking of taking a home loan 3 government banks pnb indian bank boi have reduced interest rates See which bank is offering cheap loans | होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज

होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज

Home Loan Government Banks: जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही आधीच होम लोनचा ईएमआय भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. देशातील तीन प्रमुख सरकारी बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. ही कपात जुलै महिन्यातच करण्यात आली आहे. अलीकडेच आरबीआयनंही आपल्या रेपो दरात कपात केली होती, त्यानंतर बँका आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपात करत आहेत.

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडिया (बीओआय) यांनी आपलं गृहकर्ज पूर्वीपेक्षा स्वस्त केलंय. या बँकांनी जुलैमध्ये आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) ५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे, त्यानंतर लोकांना या बँकांकडून कर्ज घेणं पूर्वीपेक्षा स्वस्त होणार आहे.

SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त

पीएनबीनं केले व्याजदर कमी

पीएनबीनं आपल्या एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे, त्यानंतर ओव्हरनाईट एमसीएलआर ८.२५ टक्क्यांवरून ८.२० टक्क्यांवर आला आहे. तर १ महिन्यांचा एमसीएलआर ८.३५ टक्के, ३ महिन्यांचा एमसीएलआर ८.५५ टक्के आणि ३ वर्षांचा एमसीएलआर ९.२० टक्के झाला आहे.

इंडियन बँक

इंडियन बँकेनंही आपल्या एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे, त्यानंतर ओव्हरनाईट एमसीएलआर ८.२० टक्के झाला आहे. तर १ महिन्याचा एमसीएलआर ८.४० टक्के, ३ महिन्यांचा एमसीएलआर ८.६० टक्के आणि १ वर्षाचा एमसीएलआर ९ टक्क्यांपर्यंत झाला आहे.



बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियानंही आपल्या एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे, त्यानंतर ओव्हरनाईट एमसीएलआर ८.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तर १ महिन्याचा एमसीएलआर ८.४० टक्के, ३ महिन्यांचा एमसीएलआर ८.५५ टक्के आणि १ वर्षाचा एमसीएलआर ९ टक्क्यांपर्यंत झाला आहे.

Web Title: Thinking of taking a home loan 3 government banks pnb indian bank boi have reduced interest rates See which bank is offering cheap loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.