Lokmat Money >बँकिंग > SBI Vs HDFC: ५ वर्षांसाठी ५ लाखांच्या कार लोनवर किती असेल EMI; कोणती बँक देतेय स्वस्त कर्ज

SBI Vs HDFC: ५ वर्षांसाठी ५ लाखांच्या कार लोनवर किती असेल EMI; कोणती बँक देतेय स्वस्त कर्ज

SBI Vs HDFC Bank Car Loan: कार विकत घेणं हे बहुतांश लोकांचं स्वप्न असतं, पण कारच्या किमती पाहता कार विकत घेणं ही मध्यमवर्गीय लोकांसाठी सोपी गोष्ट नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:47 IST2025-02-06T11:46:05+5:302025-02-06T11:47:02+5:30

SBI Vs HDFC Bank Car Loan: कार विकत घेणं हे बहुतांश लोकांचं स्वप्न असतं, पण कारच्या किमती पाहता कार विकत घेणं ही मध्यमवर्गीय लोकांसाठी सोपी गोष्ट नाही.

SBI Vs HDFC How much will be the EMI on a car loan of Rs 5 lakh for 5 years Which bank is giving cheaper loan | SBI Vs HDFC: ५ वर्षांसाठी ५ लाखांच्या कार लोनवर किती असेल EMI; कोणती बँक देतेय स्वस्त कर्ज

SBI Vs HDFC: ५ वर्षांसाठी ५ लाखांच्या कार लोनवर किती असेल EMI; कोणती बँक देतेय स्वस्त कर्ज

SBI Vs HDFC Bank Car Loan: कार विकत घेणं हे बहुतांश लोकांचं स्वप्न असतं, पण कारच्या किमती पाहता कार विकत घेणं ही मध्यमवर्गीय लोकांसाठी सोपी गोष्ट नाही. अशा वेळी लोक कार लोनचा आधार घेतात. जर तुम्हीही कार खरेदी करण्यासाठी कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला एसबीआय किंवा एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कोणती बँक फायदेशीर ठरेल हे सांगणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला लोनच्या ईएमआयबद्दलही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसबीआयकडून कार लोन

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. एसबीआयमधील कार लोनच्या व्याजदरांबद्दल बोलायचं झालं तर एसबीआयमध्ये कार लोनचे व्याजदर ९.१० टक्क्यांपासून सुरू होतात. जर तुम्ही या बँकेकडून ५ वर्षांसाठी ५ लाख रुपयांचं कार लोन घेतलं तर तुम्हाला दरमहा १०,४०३ रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण ५ वर्षात बँकेला ६,२४,२०८ रुपये द्याल, ज्यात १,२४,२०८ रुपये व्याज म्हणून आकारले जातील.

एचडीएफसी बँक

जर तुम्ही एचडीएफसी बँकेकडून कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर एचडीएफसी बँकेत कार लोनचे व्याजदर ९.२० टक्क्यांपासून सुरू होतात. अशा तऱ्हेनं जर तुम्ही या बँकेकडून ५ वर्षांसाठी ५ लाख रुपयांचं कार लोन घेतलं तर तुम्हाला दरमहा १०,४२८ रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण ५ वर्षात बँकेला ६,२५,६६७ रुपये द्याल, ज्यामध्ये १,२५,६६७ रुपये व्याजाचे असतील.

Web Title: SBI Vs HDFC How much will be the EMI on a car loan of Rs 5 lakh for 5 years Which bank is giving cheaper loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.