Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > १ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा

१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा

आरबीआयने देशभरातील बँकांसाठी बचत खात्यांवरील व्याजदरांशी, एफडी व चालू खात्या संबंधित नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार बँकांना बचत खात्यातील १ लाख रुपये पर्यंतच्या रकमेवर समान दरानं व्याज द्यावं लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:35 IST2025-12-05T14:35:07+5:302025-12-05T14:35:07+5:30

आरबीआयने देशभरातील बँकांसाठी बचत खात्यांवरील व्याजदरांशी, एफडी व चालू खात्या संबंधित नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार बँकांना बचत खात्यातील १ लाख रुपये पर्यंतच्या रकमेवर समान दरानं व्याज द्यावं लागणार आहे.

Same interest rate for amounts up to 1 lakh new rules from RBI for all banks will benefit | १ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा

१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा

आरबीआयने देशभरातील बँकांसाठी बचत खात्यांवरील व्याजदरांशी, एफडी व चालू खात्या संबंधित नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार बँकांना बचत खात्यातील १ लाख रुपये पर्यंतच्या रकमेवर समान दराने व्याज द्यावे लागणार आहे. खात्यातील रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास वेगळे व्याजदर लागू करता येतील. प्रत्येक दिवसाच्या शेवटी खात्यात जमा केलेल्या रकमेनुसार व्याज आकारले जाईल. बँकांना दर तीन महिन्यांनी एकदा खात्यात व्याज जमा करावे लागेल. 

व्याजदरावर वाटाघाटी नाही

एफडीचा मॅच्युरिटी कालावधी व्यवसाय नसलेल्या दिवशी आला, तरीही ग्राहकाला त्या दिवसाचे व्याज मिळेल आणि बँक पुढच्या व्यवसायाच्या दिवशी पेमेंट करेल. बँकांनी सर्व एफडी नियम ग्राहकांना आगाऊ सांगितलं पाहिजेत. बँका स्वतः दंडाची रक्कम ठरवू शकतात. ग्राहक आणि बँक यांच्यात व्याजदरावर कोणत्याही वाटाघाटी होणार नाही. 

सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी

हे नियमदेखील लागू

बँक कर्मचारी, निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एफडी, बचत खात्यावर १% अतिरिक्त व्याज दिलं जाऊ शकते. बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र, जास्त व्याजदराच्या एफडी योजना देऊ शकतात. जर मुदत ठेवीच्या (टीडी) मुदतपूर्तीनंतर रक्कम काढली गेली नाही, तर बचत खात्याचा व्याजदर किंवा टीडीचा मूळ व्याजदर यातील सर्वात कमी व्याजदर लागू होईल. ३ कोटी व त्यापेक्षा अधिक एफडीवर वेगळे व्याजदर लागू होतील.

साधारणपणे, चालू खात्यावर कोणतंही व्याज दिलं जात नाही. मात्र, खातेधारकाच्या मृत्यूच्या बाबतीत, मृत्यूच्या तारखेपासून पैसे भरेपर्यंत बचत खात्याच्या दरानं व्याज दिले जाईल. हे नियम ग्राहकांच्या हितासाठी घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Web Title : RBI के नए नियम: 1 लाख तक की बचत पर समान ब्याज दर

Web Summary : आरबीआई ने सभी बैंकों के लिए 1 लाख रुपये तक की बचत खातों पर समान ब्याज दर अनिवार्य की। ब्याज दैनिक रूप से मिलेगा, त्रैमासिक भुगतान होगा। गैर-व्यावसायिक दिनों पर एफडी परिपक्वता पर ब्याज मिलेगा। वरिष्ठ नागरिकों को अधिक एफडी दरें मिल सकती हैं। खाताधारक की मृत्यु पर चालू खाते पर ब्याज मिलेगा।

Web Title : RBI's New Rules: Uniform Interest for Savings up to ₹1 Lakh

Web Summary : RBI mandates uniform interest rates on savings accounts up to ₹1 lakh for all banks. Interest accrues daily, paid quarterly. FD maturity on non-business days earns interest. Senior citizens may get higher FD rates. Upon account holder's death, current accounts earn interest.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.