Lokmat Money >बँकिंग > ₹6,210 कोटींचा कर्ज घोटाळा; 'या' बँकेच्या माजी अध्यक्षाला ED ने घेतले ताब्यात

₹6,210 कोटींचा कर्ज घोटाळा; 'या' बँकेच्या माजी अध्यक्षाला ED ने घेतले ताब्यात

न्यायालयाने 21 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:17 IST2025-05-19T13:16:27+5:302025-05-19T13:17:07+5:30

न्यायालयाने 21 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

₹6,210 crore loan scam; ED takes custody of former chairman of 'this' bank | ₹6,210 कोटींचा कर्ज घोटाळा; 'या' बँकेच्या माजी अध्यक्षाला ED ने घेतले ताब्यात

₹6,210 कोटींचा कर्ज घोटाळा; 'या' बँकेच्या माजी अध्यक्षाला ED ने घेतले ताब्यात

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे. बँक फसवणूक प्रकरणात कॉनकास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेडसह इतरांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या कोलकाता विभागीय कार्यालयाने 16 मे रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार सुबोधला अटक केली.

21 मे पर्यंत ईडी कोठडी 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुबोध गोयल यांना 17 मे रोजी कोलकाता येथील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने 21 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 

6210 कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप
गोयल यांच्यावर 6,210.72 कोटी रुपयांच्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. ईडीचे म्हणणे आहे की, तपासात असे दिसून आले की, सुबोध कुमार गोयल यांच्या यूको बँकेचे अध्यक्ष आणि एमडी म्हणून कार्यकाळात यूको बँकेने सीएसपीएलला मोठी कर्जे मंजूर केली होती, जी नंतर बँकेने इतरत्र वळवली. या बदल्यात गोयलला लाच म्हणून मोठी रक्कम मिळाली.

बनावट कंपन्यांचा वापर
लाचेचे पैसे लपविण्यासाठी गोयलने रिअल इस्टेट, लक्झरी वस्तू, हॉटेल बुकिंग इत्यादींसाठी बनावट कंपन्यांचा वापर केल्याचा आरोपही आहे. गोयलच्या आधी ईडीने डिसेंबर 2024 मध्ये सीएसपीएलचे प्रवर्तक संजय सुरेका यांना अटक केली होती अन् फेब्रुवारी 2025 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. इतकेच नाही तर ईडीने संजय सुरेका आणि सीएसपीएल यांच्या सुमारे 510 कोटी रुपयांच्या मालमत्ताही जप्त केल्या होत्या. 

Web Title: ₹6,210 crore loan scam; ED takes custody of former chairman of 'this' bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.