Lokmat Money >बँकिंग > देशाच्या GDP बाबत रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अंदाज; गव्हर्नर शक्तिकांद दास म्हणाले..

देशाच्या GDP बाबत रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अंदाज; गव्हर्नर शक्तिकांद दास म्हणाले..

RBI MPC : रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी अंदाज कमी केला असून हे धक्कादायक पाऊल आहे. आरबीआय गव्हर्नर यांनीही याबाबत कारणे दिली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:04 IST2024-12-06T13:04:41+5:302024-12-06T13:04:41+5:30

RBI MPC : रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी अंदाज कमी केला असून हे धक्कादायक पाऊल आहे. आरबीआय गव्हर्नर यांनीही याबाबत कारणे दिली आहेत.

rbi mpc gdp growth estimate reduced to six point two percent for current financial year | देशाच्या GDP बाबत रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अंदाज; गव्हर्नर शक्तिकांद दास म्हणाले..

देशाच्या GDP बाबत रिझर्व्ह बँकेचा धक्कादायक अंदाज; गव्हर्नर शक्तिकांद दास म्हणाले..

RBI MPC : देशाच्या आर्थिक भविष्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार महत्त्वाचा होता. आरबीआयची चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) द्वैमासिक आढावा बैठकीतील निर्णय आज जाहीर करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी अंदाज कमी केला असून हे धक्कादायक पाऊल आहे. देशाच्या आर्थिक विकास दराबाबत केलेला हा बदल सरकारसाठीही चिंतेचा विषय ठरू शकतो. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, केंद्रीय बँकेशिवाय, भू-राजकीय आव्हाने ही सर्व देशांसाठी मोठी समस्या आहे. याशिवाय महागाईचे ताजे आकडे आणि दुसऱ्या तिमाहीतील कमी जीडीपी दर हे देखील चिंतेचे कारण आहे.

RBI कडून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी GDP अंदाज कमी
आरबीआयने जाहीर केलेल्या प्रमुख निर्णयांमध्ये देशाच्या आर्थिक विकास दराचा (जीडीपी) अंदाज कमी करण्याची घोषणा महत्त्वाची आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी GDP अंदाज कमी करून ६.६ टक्के केला आहे, जो पूर्वी ७.२ टक्के होता. ऑक्टोबरच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन किंवा GDP ७.२ टक्के असा अंदाज वर्तवला आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या उर्वरित तिमाहींमध्ये GDP कसा असेल?
या वर्षाच्या उर्वरित तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) जीडीपी वाढीचा अंदाज ६.८ टक्के आहे. यानंतर चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) जीडीपी दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या-दुसऱ्या तिमाहीसाठी वाढीचा अंदाज
आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत RBI चा वाढीचा अंदाज ६.९ टक्के आला आहे. यासोबतच पुढील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत GDP वाढीचा दर ७.३ टक्के असा अंदाज RBI ने दिला आहे .

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल नाही
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी सुरू झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) तीन दिवसीय बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. एमपीसीने रेपो दर त्याच पातळीवर म्हणजेच ६.५ टक्के राखण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीसीच्या सहा पैकी चार सदस्यांनी धोरण दर स्थिर ठेवण्यासाठी मतदान केले तर दोन सदस्यांनी ते बदलण्याच्या बाजूने मत दिले.

Web Title: rbi mpc gdp growth estimate reduced to six point two percent for current financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.