Lokmat Money >बँकिंग > कर्जासाठी बँकेच्या दारात जाण्याची गरज नाही; घरबसल्या मिळणार पैसे, RBI ने घेतला मोठा निर्णय

कर्जासाठी बँकेच्या दारात जाण्याची गरज नाही; घरबसल्या मिळणार पैसे, RBI ने घेतला मोठा निर्णय

RBI Policy : RBI ने स्मॉल फायनान्स बँकांना (SFBs) त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट लाइन उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे निमशहरी भागातील व्यक्तींसह वंचित घटकांना सहज कर्जे उपलब्ध होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:02 IST2024-12-06T13:59:59+5:302024-12-06T14:02:06+5:30

RBI Policy : RBI ने स्मॉल फायनान्स बँकांना (SFBs) त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट लाइन उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे निमशहरी भागातील व्यक्तींसह वंचित घटकांना सहज कर्जे उपलब्ध होणार आहे.

rbi allows small finance banks to extend credit line to customers | कर्जासाठी बँकेच्या दारात जाण्याची गरज नाही; घरबसल्या मिळणार पैसे, RBI ने घेतला मोठा निर्णय

कर्जासाठी बँकेच्या दारात जाण्याची गरज नाही; घरबसल्या मिळणार पैसे, RBI ने घेतला मोठा निर्णय

RBI Policy : वाढत्या महागाईत रेपो दर कमी करुन आरबीआय कर्जाचा भार कमी करतील अशी सर्व भारतीयांना आशा होती. मात्र, सलग ११व्यांदा आरबीआयने रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. मात्र, याव्यतिरिक्त असे अनेक निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या हातात सहज पैसे उपलब्ध होणार आहे. यापैकीच एक म्हणजे गरीबांना आता घरबसल्या कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने स्मॉल फायनान्स बँकांना (SFBs) त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट लाइन प्रदान करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील लघुउद्योजक, सूक्ष्म उद्योजक आणि वंचित घटकांना सहज परवडणारी कर्जे मिळणार आहेत.

यूपीआयवर प्री-अप्रूव्ड क्रेडिट लाइन हे एक आर्थिक उत्पादन आहे. सामान्य नागरिकांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी हे डिझाइन करण्यात आलं आहे. यामुळे एखादा व्यक्ती किंवा लहान व्यवसायांना बँकांकडून पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन मिळविण्याची परवानगी मिळते. ज्याचा वापर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (UPI) त्वरित व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो.

UPI क्रेडिट लाइन ही वापरकर्त्याच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) खात्याशी लिंक केलेली पूर्व-मंजूर क्रेडिट मर्यादा आहे. या सुविधेमुळे वापरकर्ते त्यांच्या बँक खात्यातून पैसे घेऊ शकतात. कर्ज म्हणून घेतलेली रक्कम हप्त्यांमध्ये किंवा बिलिंग सायकलच्या शेवटी परत केली जाऊ शकते.

UPI क्रेडिट लाइन कशी वापरायची?

  • UPI क्रेडिट लाइनद्वारे, वापरकर्ते त्यांच्या ट्राजक्शन हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअरच्या आधारे कर्ज घेऊ शकतात.
  • ही सुविधा वापरण्यापूर्वी, वापरकर्ते UPI पिनद्वारे व्यवहार प्रमाणित करू शकतात. यानंतर ते QR कोडद्वारे कुठेही पेमेंट करू शकतात.
  • UPI क्रेडिट लाइन एक प्रकारे डिजिटल क्रेडिट कार्डप्रमाणे काम करते. यामध्ये क्रेडिट कार्डप्रमाणे ग्राहकाला खर्च करण्याची मर्यादा दिली जाते.
  • या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बँकेत अर्ज करावा लागेल.
  • बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, तुमच्या खात्यात पैसे असले किंवा नसले तरीही तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकाल.
     

Web Title: rbi allows small finance banks to extend credit line to customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.