सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी स्पर्धात्मक घरकर्ज बाजारात पुन्हा मोठी झेप घेतली आहे. क्रेडिट माहिती संस्था क्रिफ हाय मार्कच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबरअखेर एकूण मूळ गृहकर्जांपैकी ५०% हिस्सा सार्वजनिक बँकांच्या खात्यात गेला आहे. यामुळे त्यांनी खासगी बँकांना मागे टाकत बाजारातील नेतृत्व मजबूत केलं आहे.
रिपोर्टनुसार, एकूण गृहकर्जांपैकी सुमारे ४० टक्के कर्जे ही ७५ लाख रुपयांहून अधिक मूल्याचे होते. घरांच्या वाढत्या किमती आणि मोठ्या शहरांतील मागणीमुळे उच्च मूल्याच्या कर्जांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. सप्टेंबरअखेर देशातील गृहकर्ज बाजार वार्षिक ११.१ टक्क्यांनी वाढून ४२.१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला असून, तिमाही आधारावर २.१% वाढ झाली आहे.
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
दैनंदिन खर्चासाठी घेतल्या जाणाऱ्या लोनमध्येही वाढ
एकूण दैनंदिन खर्चासाठी घेतल्या जाणाऱ्या लोनमध्येही मोठी वाढ झाली असून, ती १५.३ टक्के दराने वाढून १०९.६ लाख कोटी रुपये झाली आहे. मागणी कमी झाल्यानं व हंगामी कारणांमुळे ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू कर्जातील वाढ वार्षिक आधारावर १०.२% घसरली आहे.
बँकांकडून कर्जवसुलीस जोर
३१–१८० दिवस थकबाकी असलेल्या कर्जांचे प्रमाण सप्टेंबरमध्ये ३ टक्क्यांवर आलंय. जूनमध्ये हे प्रमाण ३.१% आणि गेल्या वर्षी याच काळात ३.३% होते. त्यामुळे बँकांकडून कर्जवसुली जोरदार सुरू असल्याचे दिसून येते. सरकारी बँकांच्या आक्रमक धोरणाचा हा परिणाम मानला जात आहे.
