Lokmat Money >बँकिंग > PM Mudra Loan: बिझनेस सुरू करण्यासाठी मिळतंय १० लाखांचं लोन, 'या' सरकारी स्कीम अंतर्गत मिळणार कमी व्याजदरावर कर्ज

PM Mudra Loan: बिझनेस सुरू करण्यासाठी मिळतंय १० लाखांचं लोन, 'या' सरकारी स्कीम अंतर्गत मिळणार कमी व्याजदरावर कर्ज

Govt. Mudra Loan for Business: बऱ्याच लोकांना नोकरी करायला आवडतं परंतु काही लोकांना स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करायचा असतो. मात्र, पैशांअभावी लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:58 IST2025-02-17T12:57:45+5:302025-02-17T12:58:59+5:30

Govt. Mudra Loan for Business: बऱ्याच लोकांना नोकरी करायला आवडतं परंतु काही लोकांना स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करायचा असतो. मात्र, पैशांअभावी लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येत नाही.

Loan of Rs 10 lakhs is available to start a business loan at low interest rate will be available under mudra government scheme | PM Mudra Loan: बिझनेस सुरू करण्यासाठी मिळतंय १० लाखांचं लोन, 'या' सरकारी स्कीम अंतर्गत मिळणार कमी व्याजदरावर कर्ज

PM Mudra Loan: बिझनेस सुरू करण्यासाठी मिळतंय १० लाखांचं लोन, 'या' सरकारी स्कीम अंतर्गत मिळणार कमी व्याजदरावर कर्ज

Govt. Mudra Loan for Business: बऱ्याच लोकांना नोकरी करायला आवडतं परंतु काही लोकांना स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करायचा असतो. मात्र, पैशांअभावी लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येत नाही. अशा तऱ्हेनं जर तुम्ही पैशांअभावी स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकत नसाल तर कर्ज घेऊनही तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. या योजनेचं खास गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्हाला कमी व्याजदरात सहज कर्ज मिळेल.

पीएम मुद्रा लोन स्कीम

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना पंतप्रधान मोदी यांनी २०१५ मध्ये सुरू केली होती. लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणं हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत हे कर्ज केवळ बिगर कॉर्पोरेट आणि बिगरशेती व्यवसायांसाठी दिलं जातं.

योजनेचे व्याजदर काय?

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्जाचे व्याजदर अत्यंत कमी आहेत. हे व्याजदर ९ ते १२ टक्क्यांच्या दरम्यान आहेत. याशिवाय कर्जात अन्य कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. हे कर्ज तीन प्रकारात दिले जाते. यामध्ये शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोनचा समावेश आहे. शिशु लोन अंतर्गत तुम्ही ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. किशोर श्रेणीमध्ये तुम्ही ५ लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता. तर तरुण श्रेणीमध्ये तुम्ही २० लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.

Web Title: Loan of Rs 10 lakhs is available to start a business loan at low interest rate will be available under mudra government scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.