HDFC Bank UPI Service: जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरंतर, एचडीएफसी बँकेनं आपल्या ग्राहकांना एक महत्त्वाची माहिती दिली आहे. चांगल्या आणि जलद सेवा देण्याच्या उद्देशानं, १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा सिस्टम अपग्रेड आणि देखभालीचे काम केलं जाणार असल्याची माहिती एचडीएफसीनं दिली. बँकेनं पाठवलेल्या ईमेलनुसार, ही देखभाल १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे १:३० (९० मिनिटे) पर्यंत चालेल. या काळात, एचडीएफसी बँक खात्याशी संबंधित युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा तात्पुरत्या बंद केल्या जातील. या काळात ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांसाठी बँकेचे डिजिटल वॉलेट पेझॅप वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय.
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
कोणत्या सेवांवर परिणाम होईल?
- एचडीएफसी बँकेच्या चालू/बचत खात्यांशी जोडलेले यूपीआय व्यवहार
- रुपे क्रेडिट कार्डवर आधारित यूपीआय पेमेंट
- एचडीएफसी बँक मोबाइल बँकिंग अॅप आणि इतर टीपीएपीशी (थर्ड पार्टी अॅप्स) जोडलेले यूपीआय व्यवहार
- मर्चंट्ससाठी एचडीएफसी बँक खात्याशी जोडलेल्या सर्व यूपीआय सेवा
सेवा होताहेत अपग्रेड
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की डिजिटल पेमेंटच्या वाढत्या मागणीत, मोठ्या बँका त्यांचे तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा सतत अपग्रेड करत आहेत. याचा थेट फायदा ग्राहकांना मिळेल.