improve credit score : पर्सनल लोनपासून बिझनेस लोनपर्यंत सध्या बाजारात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध आहेत. यात झटपट मिळणाऱ्या कर्जांचाही समावेश आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज केला तर पहिला तुमचा क्रेडिट स्कोर तपासला जातो. त्यानंतरच तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही? किंवा किती व्याजदर आकारायचा यावर निर्णय घेतला जातो. तुमची क्रेडिट किंवा सिबील स्कोअर ही तुमच्या कर्ज परतफेडीची योग्यता तपासण्याचे मोजमाप आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोर फारच वाईट असेल तर तो तुम्ही ३० दिवसांच्या आत सुधारू शकता.
कोणतंही बिल भरण्यास उशीर करू नका
तुमचा क्रेडिट स्कोअर त्वरीत सुधारण्याचा पहिला मार्ग म्हणजे कोणतंही बिल भरण्यास उशीर न करणे. क्रेडिट कार्ड असो, लोन ईएमआय किंवा इतर कोणतेही बिल, ते देय तारखेपर्यंत भरा. तुम्ही आगाऊ पैसे भरले तर ते अधिक चांगले होईल, म्हणजे निश्चित मुदतीपूर्वीच. यातून तुम्हाला अधिक फायदा मिळू शकतो.
क्रेडिट कार्ड घ्या
जर तुम्ही कधीच कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नसल्यास तुमचा क्रेडिट इतिहास तयार होत नाही. कदाचित, कर्ज न घेतल्याचा तुम्हाला अनुभव वाटू शकतो. मात्र, हीच गोष्ट तुम्हाला कर्ज घेण्यात अडथळा ठरू शकते. क्रेडिट हिस्ट्री असणे ही वाईट गोष्ट नाही. कारण, जर तुमचा क्रेडिट स्कोर असेल तर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. म्हणून, क्रेडिट कार्ड घेऊन ते योग्यप्रकारे वापरायला सुरुवात करा.
क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी करा
३० दिवसांत क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी ही टीप खूप कामी येते. यासाठी तुमचा क्रेडिट युटिलायझेशन ३०% च्या खाली ठेवणे. समजा तुमचे क्रेडिट लिमिट १ लाख रुपये आहे तर ३० हजार रुपयांच्यावर पैसे खर्च करू नका. जोपर्यंत तुमचा क्रेडिट स्कोअर वाढत नाही तोपर्यंत तुमच्या कार्डवर ३०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च करू नका. असे केल्याने, तुमचा क्रेडिट स्कोअर झपाट्याने वाढेल.
क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याची विनंती
तुम्ही तुमचा क्रेडिट वापर ३०% किंवा त्याहून अधिक ठेवण्यास यशस्वी झाला तर दुसरं पाऊल टाका. ते म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याची विनंती करा. जास्त क्रेडिट कार्ड मर्यादेसाठी मंजूरी मिळणे म्हणजे तुम्ही एक जबाबदार वापरकर्ता असल्याचे स्पष्ट होते. याचा परिणाम तुमच्या स्कोअर सुधारण्यावर होतो.
कॅश-बॅक्ड क्रेडिट कार्ड निवडा
कॅश-बॅक्ड क्रेडिट कार्ड निवडणे हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. तुम्ही एकरकमी रक्कम जमा करून हे करू शकता. जी तुमच्या क्रेडिट मर्यादेइतकी किंवा किंचित कमी असेल. क्रेडिट स्कोअर जलद सुधारण्याचा हा उत्तम मार्ग आहे. सुरक्षित क्रेडिट कार्ड निवडणे हा प्रथम वापरकर्त्यांसाठी क्रेडिट कार्ड मिळविण्याचा एक चांगला मार्ग आहे.
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घेऊ नका
तुमचा क्रेडिट स्कोअर त्वरीत सुधारण्यासाठी, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घेऊ नका. बँका जास्त कर्ज घेणाऱ्यांचा क्रेडिट कमी मानतात. कर्जदार अनेक कर्जाची वेळेवर परतफेड करण्यात अपयशी ठरल्यास त्याचा त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
क्रेडिट रिपोर्टचा मागोवा घ्या
क्रेडिट स्कोअर हा भारताच्या चार अधिकृत क्रेडिट ब्युरो - CIBIL, Equifax, Highmark™ आणि Experian द्वारे जारी केलेल्या सर्वसमावेशक क्रेडिट अहवालाचा भाग आहे. क्रेडिट रिपोर्ट्सचा नियमित मागोवा घेतल्यास संबंधित ब्युरो किंवा प्राधिकरणाला कोणतीही विसंगती किंवा त्रुटी कळू शकते. ३० दिवसांत क्रेडिट स्कोअर सुधारण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्याचे त्वरित निराकरण करणे.