Bank of Baroda Home Loan Salary Eligibility: भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात केली होती, त्यानंतर रेपो रेट घसरून ५.२५ टक्क्यांवर आला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे होम लोनच्या व्याजदरातही मोठी घट झाली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर देशातील सर्वच बँकांनी होम लोनचे व्याजदर कमी केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आता केवळ ७.२० टक्क्यांच्या सुरुवातीच्या दरानं होम लोन देत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की बँक ऑफ बडोदाकडून ५० लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी तुमचा मासिक पगार किती असावा आणि त्यासाठी तुम्हाला दरमहा किती ईएमआय (EMI) भरावा लागेल?
वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जासाठी वेगवेगळी पात्रता
बँक ऑफ बडोदाकडून ऑफर केल्या जाणाऱ्या होम लोनच्या किमान ७.२० टक्के व्याजदरानुसार गणना केल्यास, ५० लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी मासिक पगार ६८,००० रुपये असावा. ही गणना ३० वर्षांच्या कर्जाच्या कालावधीनुसार केली गेली आहे. जर तुम्हाला २५ वर्षांसाठी कर्ज घ्यायचं असेल, तर त्यानुसार तुमचा मासिक पगार ७२,००० रुपये आणि २० वर्षांनुसार तुमचा मासिक पगार ७९,००० रुपये असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा की या गणनेनुसार कर्ज घेण्यासाठी तुमचं आधीपासून कोणतंही दुसरे कर्ज सुरू नसावं.
५० लाख रुपयांसाठी किती ईएमआय?
- ३० वर्षांच्या होम लोनसाठी: ६८,००० रुपये पगार असल्यास तुमचा मासिक ईएमआय सुमारे ३४,००० रुपये असेल.
- २५ वर्षांच्या होम लोनसाठी: ७२,००० रुपये पगार असल्यास तुमचा मासिक ईएमआय सुमारे ३६,००० रुपये असेल.
- २० वर्षांच्या होम लोनसाठी: ७९,००० रुपये पगार असल्यास तुमचा मासिक ईएमआय सुमारे ३९,५०० रुपये असेल.
कोणत्याही बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणं आवश्यक आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तर बँक तुम्हाला कर्ज देण्यास नकार देऊ शकते. क्रेडिट स्कोअर व्यतिरिक्त तुमच्या जुन्या कर्ज खात्यांची देखील तपासणी केली जाते.
