Bank of Baroda Home Loan: मोठ्या शहरांमध्ये घर खरेदी करण्यासाठी सामान्यतः होम लोनची (Home Loan) गरज पडतेच. विशेषतः, मोठ्या शहरांमध्ये भाड्यानं राहणारे लोक आपले घर खरेदी करण्यासाठी होम लोनवर अवलंबून असतात. आरबीआयनं (RBI) यावर्षी रेपो रेट १ टक्क्यानं कमी केला आहे, ज्यामुळे होम लोनचे दर देखील १ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत.
आज आपण येथे जाणून घेऊया की बँक ऑफ बडोदामधून (Bank of Baroda) ६० लाख रुपयांचं होम लोन घेण्यासाठी तुमचा मासिक पगार किती असावा लागेल आणि यासाठी तुम्हाला दरमहा किती रुपयांचा ईएमआय (EMI) भरावा लागेल.
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
७.४५ टक्के दरानं मिळतंय होम लोन
आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर देशातील अनेक बँकांनी होम लोनसह इतर सर्व कर्जांचे व्याजदर देखील कमी केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदानंदेखील होम लोनच्या व्याजदरात कपात केली आहे. बँक ऑफ बडोदा आता ७.४५ टक्के च्या सुरुवातीच्या दरानं होम लोन देत आहे.
आवश्यक मासिक पगार
७.४५ टक्के व्याजदराने ३० वर्षांसाठी ६० लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी तुमचा मासिक पगार ₹८३,५०० असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला एका खास गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल की तुमच्या नावावर दुसरं कोणतंही लोन सुरू नसावं.
किती EMI भरावा लागेल?
बँक ऑफ बडोदामधून ७.४५ टक्के व्याजदराने ३० वर्षांसाठी ६० लाख रुपयांचे होम लोन घेतल्यास तुम्हाला दरमहा जवळपास ₹४१,७५० चा ईएमआय भरावा लागेल. कोणत्याही बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तर बँक तुमचा लोन अर्ज नाकारू शकते. कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी चांगला क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा असतो. क्रेडिट स्कोअर व्यतिरिक्त, तुमच्या जुन्या लोन खात्यांची देखील तपासणी केली जाते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्ही बँकेकडे व्याजदरात सवलतीची मागणी देखील करू शकता.
