प्रत्येकजण स्वतःसाठी हक्काच्या घराच्या शोधात असतो. परंतु वाढती महागाई आणि होम लोनच्या मोठ्या हप्त्यांमुळे प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घर खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी समोर आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेनं (Canara Bank) घर खरेदीदारांसाठी मोठी भेट दिली आहे. बँकेनं आपल्या MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट) मध्ये ५ बेसिस पॉइंट्सची (०.०५%) केली आहे. यामुळे होम लोन स्वस्त होईल आणि घर खरेदीदारांचे ईएमआय (EMI) कमी होईल. हे नवे दर १२ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.
ग्राहकांना होणार फायदा
कॅनरा बँकेच्या या निर्णयामुळे फ्लोटिंग रेट लोन (Floating Rate Loan) घेतलेल्या ग्राहकांसाठी ईएमआय (EMI) मध्ये घट होऊ शकते. यासोबतच ऑटो लोन आणि पर्सनल लोनचा ईएमआय देखील कमी होईल. याचा अर्थ असा की, जर तुमचे लोन MCLR शी जोडलेलं असेल, तर तुमचा ईएमआय आता पूर्वीपेक्षा कमी होईल.
जर एखाद्या ग्राहकाचं ₹ ३० लाखाचं होम लोन २० वर्षांच्या कालावधीसाठी असेल, तर व्याजदरांमध्ये ०.०५% ची घसरण झाल्यामुळे दरमहा सुमारे ₹ १५० ते ₹ २०० पर्यंत बचत होऊ शकते. या कपातीदरम्यान, बँक ऑफ बडोदा (BoB) आणि आयडीबीआय बँकेनं (IDBI) त्यांच्या व्याजदरांमध्ये सध्या कोणताही बदल केलेला नाही.
कॅनरा बँकेचे नवे MCLR दर खालीलप्रमाणे आहेत
कॅनरा बँकेचे नवीन एमसीएलआर दर खालीलप्रमाणे आहेत
ओव्हरनाईट एमसीएलआर आता ७.९०% (पूर्वी ७.९५%) आहे
एक महिन्याचा एमसीएलआर ७.९५% (पूर्वी ८.००%) आहे
तीन महिन्यांचा एमसीएलआर ८.१५% (पूर्वी ८.२०%) आहे
सहा महिन्यांचा एमसीएलआर ८.५०% (पूर्वी ८.५५%) आहे
एक वर्षाचा एमसीएलआर ८.७०% (पूर्वी ८.७५%) आहे
दोन वर्षांचा एमसीएलआर ८.८५% आहे
तीन वर्षांचा एमसीएलआर ८.९०% पर्यंत वाढवण्यात आला आहे.
अन्य बँकांचे दर
कॅनरा बँकेने व्याजदरात कपात करून दिलासा दिला आहे. दुसरीकडे, बँक ऑफ बडोदा (BoB) आणि आयडीबीआय बँक (IDBI) यांनी त्यांचे लेंडिंग रेट्स (Lending Rates) कायम ठेवले आहेत. बँक ऑफ बडोदा (BoB) चा एक वर्षाचा MCLR सध्या ८.७५% वर कायम आहे. IDBI बँकेचा एक वर्षाचा MCLR देखील ८.७५% आहे, तर तीन वर्षांचा दर ९.७०% आहे.
MCLR चा अर्थ काय?
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (Marginal Cost of Funds Based Lending Rate - MCLR) हा किमान व्याजदर असतो, ज्यावर बँक ग्राहकांना कर्ज देते. हा दर तुमचा फ्लोटिंग रेट लोन (जसं की होम लोन किंवा कार लोन) कोणत्या व्याजदरावर चालेल हे ठरवतो. जर बँकेनं MCLR कमी केला, तर ग्राहकांचा ईएमआय (EMI) देखील कमी होतो किंवा ते त्यांच्या कर्जाचा कालावधी कमी करू शकतात. त्यामुळे, ही बातमी विशेषतः कर्जधारकांसाठी दिलासादायक आहे.
