Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?

गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?

Home Loan Transfer : जर तुम्हाला तुमच्या गृहकर्जाचा ईएमआय खूप जास्त वाटत असेल, तर तुम्ही तो दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:13 IST2025-12-26T14:50:29+5:302025-12-26T16:13:33+5:30

Home Loan Transfer : जर तुम्हाला तुमच्या गृहकर्जाचा ईएमआय खूप जास्त वाटत असेल, तर तुम्ही तो दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता.

Home Loan Balance Transfer Guide How and When to Switch Your Bank for Lower Interest? | गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?

गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?

Home Loan Transfer : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश मध्यमवर्गीय 'गृहकर्जा'चा आधार घेतात. हे कर्ज १५ ते २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी असल्याने, व्याजाच्या दरात झालेली थोडीशी वाढही खिशावर मोठा भार टाकते. अशा वेळी, जर तुमची सध्याची बँक जास्त व्याज आकारत असेल, तर दुसऱ्या बँकेत कर्ज हस्तांतरित करणे हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो. मात्र, हे ट्रान्सफर कधी करावे आणि त्याची प्रक्रिया काय, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

किती काळानंतर कर्ज ट्रान्सफर करता येते?
गृहकर्ज हे दीर्घकालीन असते. मात्र, ते दुसऱ्या बँकेत नेण्यासाठी तुम्हाला किमान प्रतीक्षा करावी लागते. बँकिंग नियमांनुसार, साधारणपणे ६ महिने ते १ वर्षाचे हप्ते नियमित भरल्यानंतर तुम्ही कर्ज हस्तांतरित करण्यासाठी पात्र ठरता. तुमचा 'रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड' चांगला असेल, तर नवीन बँक तुमचे कर्ज आनंदाने स्वीकारते.

कर्ज हस्तांतरणाची प्रक्रिया

  • सध्याच्या बँकेला कळवा : सर्वात आधी तुमच्या विद्यमान बँकेला कर्ज हस्तांतरणाबाबत लेखी कळवा. अनेकदा, ग्राहक सोडून जाऊ नये म्हणून तुमची बँक स्वतःहून व्याजाचा दर कमी करण्याची शक्यता असते.
  • ना हरकत प्रमाणपत्र : जर बँक दर कमी करण्यास तयार नसेल, तर त्यांच्याकडून 'एनओसी' आणि कर्जाच्या कागदपत्रांची यादी मागवून घ्या. याशिवाय 'आउटस्टँडिंग बॅलन्स'चे स्टेटमेंटही घ्या.
  • नवीन बँकेकडे अर्ज : सर्व कागदपत्रे आणि एनओसी घेऊन नवीन बँकेत अर्ज करा. नवीन बँक तुमच्या मालमत्तेची आणि उत्पन्नाची पुन्हा पडताळणी करेल.
  • जुने खाते बंद करा : नवीन बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर ती रक्कम तुमच्या जुन्या बँकेला दिली जाते. जुन्या बँकेकडून तुमचे कर्ज खाते पूर्णपणे बंद झाल्याचे खात्रीशीर पत्र घ्या.
  • नवीन EMI सुरू : जुन्या बँकेतून कागदपत्रे नवीन बँकेकडे सुपूर्द झाल्यानंतर तुमचे नवीन आणि कमी व्याजदराचे हप्ते सुरू होतील.

वाचा - सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश

ट्रान्सफरसाठी किती खर्च येतो?

  • प्रोसेसिंग फी : नवीन बँक कर्ज मंजूर करताना कर्ज रकमेच्या ०.५% ते १% प्रोसेसिंग फी आकारते.
  • फोरक्लोजर चार्जेस : फ्लोटिंग रेटवर सध्या कोणतेही शुल्क लागत नाही, मात्र तुमचे कर्ज 'फिक्स्ड रेट'वर असेल, तर जुनी बँक शुल्क आकारू शकते.
  • इतर खर्च : मुद्रांक शुल्क आणि कायदेशीर शुल्काचाही विचार करावा लागतो.

Web Title : होम लोन ईएमआई बढ़ी? लोन ट्रांसफर से लाखों बचाएं!

Web Summary : होम लोन पर ज़्यादा ब्याज? लोन ट्रांसफर करके पैसे बचाएं। प्रक्रिया, पात्रता और संभावित बचत के लिए संबंधित खर्चों को समझें।

Web Title : Home loan EMI increased? Save lakhs with loan transfer!

Web Summary : High home loan interest? Transferring your loan to another bank can save money. Understand transfer process, eligibility, and associated costs for potential savings.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.