Car Loan Interest Rates : जीएसटी दर कपात झाल्यानंतर अनेक वस्तू आणि वाहनांच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. या दिवाळीला तुम्ही देखील चारचाकी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमची आणखी बचत करू शकते. कुठलंही वाहन घेताना स्वस्तात कर्ज कुठे मिळतंय याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी बाजारातील विविध बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आज आम्ही तुम्हाला देशातील प्रमुख खासगी बँकांच्याकार कर्जाचे व्याजदर आणि ७ लाख रुपये कर्जासाठी ५ वर्षांचा मासिक हप्ता किती असेल, याची माहिती देत आहोत.
खासगी बँकांचे कार कर्ज दर आणि मासिक हप्ता
येथे आम्ही ७ लाख रुपये कर्जावर ५ वर्षांच्या (६० महिने) कालावधीसाठी देय असलेल्या मासिक हप्त्याची तुलना केली आहे.
बँकेचे नाव | वार्षिक व्याज दर (अंदाजित) | ₹७ लाखांसाठी मासिक EMI (५ वर्षांसाठी) |
इंडसइंड बँक | ८.००% | ₹१४,१८८ |
आयसीआयसीआय बँक | ८.५०% | ₹१४,३५७ |
ॲक्सिस बँक | ८.८०% | ₹१४,४६० |
एचडीएफसी बँक | ९.४०% | ₹१४,६४६ |
येस बँक | ९.७०% | ₹१४,७५० |
टीप: वरील व्याजदर बँकेच्या क्रेडिट स्कोअर, कर्जदाराचा प्रकार आणि कर्जाच्या प्रकारानुसार बदलू शकतात.
वाचा - गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
सर्वात स्वस्त कार कर्ज कोठे?
- वरील आकडेवारीनुसार, इंडसइंड बँक सर्वात कमी व्याजदरावर (८.००%) कार कर्ज देत आहे, ज्यामुळे तुमचा मासिक हप्ता १४,१८८ रुपये इतका कमी राहील.
- या तुलनेत, येस बँकेचा व्याजदर (९.७०%) सर्वाधिक असल्याने, तुमचा मासिक हप्ता १४,७५० रुपये इतका असेल.
- कार कर्ज घेण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची आणि अटी व शर्तींची तुलना करणे नेहमीच फायदेशीर ठरते. कमी व्याजदरामुळे तुमचे लाखो रुपये वाचू शकतात आणि कर्जाचा बोजा कमी होतो.