lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > HDFC बँकेनं अंदाजांना टाकलं मागे, नफा ३४ टक्क्यांनी वाढला; व्याजाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ

HDFC बँकेनं अंदाजांना टाकलं मागे, नफा ३४ टक्क्यांनी वाढला; व्याजाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ

देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट लेंडर एचडीएफसी बँकेनं (HDFC Bank) मंगळवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 08:47 AM2024-01-17T08:47:30+5:302024-01-17T08:47:52+5:30

देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट लेंडर एचडीएफसी बँकेनं (HDFC Bank) मंगळवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले.

HDFC Bank q3 results Profits Rise 34 Percent Also increase in income through interest | HDFC बँकेनं अंदाजांना टाकलं मागे, नफा ३४ टक्क्यांनी वाढला; व्याजाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ

HDFC बँकेनं अंदाजांना टाकलं मागे, नफा ३४ टक्क्यांनी वाढला; व्याजाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ

देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट लेंडर एचडीएफसी बँकेनं (HDFC Bank) मंगळवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या काळात बँकेचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. बँकेचा निव्वळ नफा 34 टक्क्यांनी वाढून 16,372.54 कोटी रुपये झाला आहे. डिसेंबर तिमाहीत बँकेचं निव्वळ व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न 24 टक्क्यांनी वाढून 28,471.34 कोटी रुपये झालंय. गेल्या तिमाहीच्या आधारे बँकेच्या नफ्यात 2.5 टक्के तर निव्वळ व्याज उत्पन्नात सुमारे चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एचडीएफसी बँक ही रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस नंतर देशातील तिसरी सर्वात मोठी मूल्यवान कंपनी आहे. मंगळवारी कंपनीचे शेअर्स 0.42 टक्क्यांच्या वाढीसह 1678.95 रुपयांवर बंद झाले. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीनं आपला तिमाही निकाल जाहीर केला. एचडीएफसी बँकेने शेअर बाजाराला सांगितलं की, डिसेंबरच्या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न 81,720 कोटी रुपये होते, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 51,208 कोटी रुपये होते. एकत्रित आधारावर बँकेचा नफा ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मध्ये 12,735 कोटी रुपयांवरून 39 टक्क्यांनी वाढून 17,718 कोटी रुपये झाला आहे.

समीक्षाधीन तिमाहीत एकत्रित आधारावर बँकेचं एकूण उत्पन्न 1,15,015 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 54,123 कोटी रुपये होते. असेट्स क्वालिटीच्या बाबतीत, बँकेच्या एकूण कर्जावरील एनपीए डिसेंबर 2022 तिमाहीत 1.23 टक्क्यांवरून डिसेंबर 2023 तिमाहीत किरकोळ वाढून 1.26 टक्के झाला. तथापि, या काळात बँकेचा निव्वळ एनपीए 0.31 टक्के राहिला, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 0.33 टक्के होता.

Web Title: HDFC Bank q3 results Profits Rise 34 Percent Also increase in income through interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.