Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?

स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?

Personal Loan : जर तुम्ही सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज दर शोधत असाल, तर अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:29 IST2025-12-17T14:28:22+5:302025-12-17T14:29:36+5:30

Personal Loan : जर तुम्ही सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज दर शोधत असाल, तर अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे.

Cheapest Personal Loan in India Top 5 Banks Offering Interest Rates Starting from 8.75% | स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?

स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?

Personal Loan : घरगुती गरज, लग्नकार्य किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या देशातील काही प्रमुख बँका ग्राहकांना अतिशय आकर्षक व्याजदरांवर कर्ज उपलब्ध करून देत आहेत. योग्य बँकेची निवड केल्यास तुमचा मासिक हप्ता कमी होऊन आर्थिक ओझे हलके होऊ शकते.

कोणाला मिळते सर्वात स्वस्त कर्ज?
बँकांचे सर्वात कमी व्याजदर सरसकट सर्वांसाठी नसतात. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर ८०० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांनाच बँका आपल्या सर्वात स्वस्त दरात कर्ज ऑफर करतात. तुमच्या उत्पन्नाचा स्रोत आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता यावर बँक अंतिम निर्णय घेते.

सर्वात कमी व्याजदर देणाऱ्या 'टॉप ५' बँका
१. बँक ऑफ महाराष्ट्र

  • सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक सध्या देशात सर्वात स्वस्त दरात म्हणजेच केवळ ८.७५% दराने पर्सनल लोन देत आहे.
  • प्रक्रिया शुल्क : कर्ज रकमेच्या १% + GST.
  • कमाल कर्ज मर्यादा : २० लाख रुपयांपर्यंत.
  • पात्रता : किमान वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असावे.

२. पंजाब अँड सिंध बँक

  • ही बँक ९.६०% या सुरुवातीच्या दराने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे.
  • प्रक्रिया शुल्क: ०.५०% ते १% पर्यंत.

३. खासगी क्षेत्रातील बँका एचडीएफसी, अॅक्सिस आणि आयडीएफसी फर्स्ट

  • एचडीएफसी, अ‍ॅक्सिस आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या तिन्ही बँका ९.९९% दराने कर्ज देत आहेत.
  • एचडीएफसी बँक: ५० लाखांपर्यंत कर्ज मर्यादा. प्री-अप्रूव्ड ग्राहकांना अवघ्या १० सेकंदात, तर नवीन ग्राहकांना ४ दिवसांत निधी मिळतो.
  • अॅक्सिस आणि आयडीएफसी : कर्ज रकमेच्या २% पर्यंत प्रक्रिया शुल्क आकारले जाते.

१२ लाख कर्जाचे ईएमआय गणित

व्याजदर मासिक हप्ता५ वर्षांतील एकूण व्याज
८.७५% (बँक ऑफ महाराष्ट्र)२४,७६५२,८५,८८१
९.९९% (इतर बँका)२५,४९१३,२९,४३३

वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!

व्याजदरातील सव्वा टक्क्यांच्या फरकामुळे तुम्हाला ५ वर्षांत जवळपास ४३,५५२ रुपये अतिरिक्त मोजावे लागू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी व्याजदराची तुलना करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Web Title : सबसे सस्ते पर्सनल लोन: टॉप 5 बैंक और ईएमआई गणना

Web Summary : पर्सनल लोन की तलाश है? कई बैंक आकर्षक दरें प्रदान करते हैं, खासकर उच्च क्रेडिट स्कोर वालों के लिए। बैंक ऑफ महाराष्ट्र 8.75% के साथ अग्रणी है। ईएमआई पर बचत के लिए दरों की तुलना करें।

Web Title : Cheapest Personal Loans: Top 5 Banks & EMI Calculations

Web Summary : Seeking a personal loan? Several banks offer attractive rates, especially for those with high credit scores. Bank of Maharashtra leads with 8.75%. Compare rates to save significantly on EMIs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.