Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > पर्सनल लोनसाठी 'ही' बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज; पाहा 'एसबीआय'सह ८ मोठ्या बँकांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फी

पर्सनल लोनसाठी 'ही' बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज; पाहा 'एसबीआय'सह ८ मोठ्या बँकांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फी

Personal Loan : जर तुम्ही देखील वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर विविध बँका कोणत्या व्याजदराने कर्जे देत आहेत, हे सर्वप्रथम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:56 IST2026-03-23T11:55:03+5:302026-03-23T11:56:13+5:30

Personal Loan : जर तुम्ही देखील वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर विविध बँका कोणत्या व्याजदराने कर्जे देत आहेत, हे सर्वप्रथम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Best Personal Loan Interest Rates March 2026 Compare SBI, HDFC, ICICI, and Union Bank | पर्सनल लोनसाठी 'ही' बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज; पाहा 'एसबीआय'सह ८ मोठ्या बँकांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फी

पर्सनल लोनसाठी 'ही' बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज; पाहा 'एसबीआय'सह ८ मोठ्या बँकांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फी

Personal Loan : आर्थिक गरजांसाठी 'पर्सनल लोन' घेणाऱ्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र, कर्ज घेण्यापूर्वी विविध बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे अत्यंत आवश्यक आहे. मार्च २०२६ च्या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख बँकांचे व्याजदर ८.७५% ते १८.००% या दरम्यान आहेत. तुमचा सिबिल स्कोर, उत्पन्नाचे साधन आणि आर्थिक पार्श्वभूमी यावर बँका तुम्हाला किती दराने कर्ज द्यायचे हे ठरवतात. योग्य बँकेची निवड केल्यास तुम्ही दरमहा हजारो रुपयांची बचत करू शकता.


प्रमुख बँकांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फी (मार्च २०२६)

येथे देशातील टॉप ८ बँकांच्या ताज्या दरांची तुलना दिली आहे

बँक व्याजदर (वार्षिक) प्रोसेसिंग फी (रुपये)
युनियन बँक ऑफ इंडिया८.७५% - १२.५५% कर्जाच्या १% (जास्तीत जास्त ७,५००)
कॅनरा बँक ९.७०% - १५.१५% ०.५% (१,००० ते ५,०००) 
HDFC बँक ९.९९% पासून सुरू ६,५०० पर्यंत 
ICICI बँक९.९९% पासून सुरूकर्जाच्या २% पर्यंत
भारतीय स्टेट बँक१०.००% - १५.००% १.५% (१,००० ते १५,०००)
बँक ऑफ बडोदा१०.१५% - १८.००%२% पर्यंत (जास्तीत जास्त १०,०००)
कोटक महिंद्रा बँक१०.९९% पासून सुरू५% पर्यंत
फेडरल बँक११.७५% - १८.९९% ३% पर्यंत 

कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

  1. व्याजदरांची तुलना : अर्धा किंवा एक टक्का व्याजाचा फरकही तुमच्या खिशावर मोठा परिणाम करू शकतो. किमान ३-४ बँकांच्या दरांची तुलना 'ईएमआय कॅल्क्युलेटर'वर करून पहा.
  2. प्रोसेसिंग फीचा भार : अनेकदा बँका व्याजदर कमी दाखवतात, पण 'फाईल चार्जेस' किंवा प्रोसेसिंग फी जास्त आकारतात. कर्जाची एकूण रक्कम आणि हातातील प्रत्यक्ष रक्कम यात किती तफावत आहे, हे तपासा.
  3. कालावधीची निवड : कर्जाचा कालावधी जितका जास्त, तितका ईएमआय कमी असेल; पण लक्षात ठेवा, दीर्घ कालावधीत तुम्हाला एकूण व्याजापोटी मोठी रक्कम मोजावी लागेल.
  4. सिबिल स्कोर : तुमचा स्कोर ७५० पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही बँकेसोबत घासाघीस करून व्याजदर कमी करून घेऊ शकता. उत्तम सिबिल असेल तर बँका प्रोसेसिंग फीमध्येही सवलत देतात.

वाचा - युद्धामुळे भारतीय शेतकरी चिंतेत! LPG नंतर आता देशासमोर आणखी एक संकट; आगामी खरीप हंगामाला फटका?

  1. छुपे खर्च : मुदतीपूर्वी कर्ज बंद केल्यास किती दंड लागेल किंवा हप्ता उशिरा भरल्यास किती दंड आकारला जाईल, याची माहिती आधीच करून घ्या.
     

Web Title : सबसे सस्ता पर्सनल लोन: शीर्ष बैंकों की ब्याज दरें और प्रोसेसिंग फीस

Web Summary : पर्सनल लोन की मांग बढ़ी। आवेदन करने से पहले ब्याज दरों की तुलना करें। दरें 8.75% से 18.00% तक हैं। सर्वोत्तम सौदे के लिए प्रोसेसिंग फीस, ऋण अवधि और सिबिल स्कोर पर विचार करें। यूनियन बैंक 8.75% पर सबसे कम दर प्रदान करता है।

Web Title : Cheapest personal loans: Interest rates and processing fees of top banks.

Web Summary : Personal loan demand surges. Compare interest rates before applying. Rates range from 8.75% to 18.00%. Consider processing fees, loan tenure, and CIBIL score for the best deal. Union Bank offers the lowest rate at 8.75%.