Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > कोण आहेत अतनु चक्रवर्ती? आधी IAS अधिकारी, त्यानंतर बँकिंग विश्वात एन्ट्री; आता तडकाफडकी HDFC का सोडली?

कोण आहेत अतनु चक्रवर्ती? आधी IAS अधिकारी, त्यानंतर बँकिंग विश्वात एन्ट्री; आता तडकाफडकी HDFC का सोडली?

Atanu Chakraborty : अतनु चक्रवर्ती यांनी एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला आहे. गुजरात केडरचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या चक्रवर्ती यांना सार्वजनिक धोरण आणि वित्तीय प्रशासनाचा ३० हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 14:22 IST2026-03-19T14:20:05+5:302026-03-19T14:22:28+5:30

Atanu Chakraborty : अतनु चक्रवर्ती यांनी एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला आहे. गुजरात केडरचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या चक्रवर्ती यांना सार्वजनिक धोरण आणि वित्तीय प्रशासनाचा ३० हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.

Atanu Chakraborty Resigns as HDFC Bank Chairman Allegations on Corporate Governance and Ethics | कोण आहेत अतनु चक्रवर्ती? आधी IAS अधिकारी, त्यानंतर बँकिंग विश्वात एन्ट्री; आता तडकाफडकी HDFC का सोडली?

कोण आहेत अतनु चक्रवर्ती? आधी IAS अधिकारी, त्यानंतर बँकिंग विश्वात एन्ट्री; आता तडकाफडकी HDFC का सोडली?

Atanu Chakraborty : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या 'एचडीएफसी'बँकेच्या वर्तुळात गुरुवारी एकच खळबळ उडाली. बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष आणि माजी आयएएस अधिकारी अतनु चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. केवळ राजीनामाच नव्हे, तर त्यांनी बँकेच्या कामकाजावर आणि अंतर्गत संस्कृतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने कॉर्पोरेट जगतात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. "बँकेतील काही पद्धती माझ्या वैयक्तिक मूल्यांशी विसंगत आहेत," असे खळबळजनक विधान चक्रवर्ती यांनी केल्याने बँकेच्या 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स'वर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोण आहेत अतनु चक्रवर्ती?
अतनु चक्रवर्ती हे गुजरात केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. सार्वजनिक धोरण आणि वित्त प्रशासनाचा ३० वर्षांहून अधिक प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. तसेच 'दीपम' विभागाचे सचिव म्हणून सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमात त्यांची भूमिका कळीची होती. मे २०२१ मध्ये त्यांनी एचडीएफसी बँकेच्या बोर्डावर स्वतंत्र संचालक म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यानंतर त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.

राजीनाम्यामागचे 'नैतिक' नाट्य
अतनु चक्रवर्ती यांनी दिलेला राजीनामा हा केवळ प्रशासकीय नसून तो वैचारिक मतभेदांतून आल्याचे स्पष्ट होत आहे. राजीनामा देताना त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. "गेल्या दोन वर्षांत बँकेच्या अंतर्गत कामकाजात अशा काही घटना आणि कार्यपद्धती मी पाहिल्या आहेत, ज्या माझ्या वैयक्तिक मूल्यांना आणि नैतिकतेला पटणाऱ्या नाहीत. त्यामुळे मी या पदावर राहणे योग्य समजत नाही."

विलीनीकरणानंतरचे आव्हान की अंतर्गत कलह?
एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांच्यातील महा-विलीनीकरणानंतर बँक सध्या एका अत्यंत क्लिष्ट स्थितीतून जात आहे. अशा वेळी एका अनुभवी अध्यक्षाने 'नैतिकते'चा मुद्दा काढून राजीनामा देणे, हे गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे कारण ठरले आहे. या राजीनाम्यामुळे बँकेच्या अंतर्गत पारदर्शकतेवर आणि निर्णय प्रक्रियेवर आता तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वाचा - HDFC बँक अध्यक्षांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ; अखेर बँक व्यवस्थापनाने दिले स्पष्टीकरण

गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा?

  • एचडीएफसी बँक नेहमीच आपल्या शिस्तबद्ध कारभारासाठी ओळखली जाते. मात्र, माजी वित्त सचिवांसारख्या व्यक्तीने 'गव्हर्नन्स'वर आरोप करणे बँकेच्या प्रतिमेसाठी घातक ठरू शकते.
  • या राजीनाम्याच्या वृत्तामुळे आगामी सत्रात एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळू शकते.
  • आता रिझर्व्ह बँक या आरोपांची दखल घेणार का? आणि बँकेचे व्यवस्थापन यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : अतनु चक्रवर्ती का HDFC से इस्तीफा: गवर्नेंस पर सवाल उठे.

Web Summary : अतनु चक्रवर्ती के एचडीएफसी बैंक से अचानक इस्तीफे ने हलचल मचा दी है, उन्होंने मूल्यों के टकराव का हवाला दिया है. इस पूर्व आईएएस अधिकारी के कदम ने विलय के बाद बैंक की नैतिकता पर सवाल उठाए हैं, जिससे निवेशक चिंतित हैं.

Web Title : Ex-IAS Atanu Chakraborty's HDFC exit raises governance questions: Explained.

Web Summary : Atanu Chakraborty's abrupt HDFC Bank resignation, citing values clash and raising governance concerns, sparks turmoil. The ex-IAS officer's move questions the bank's ethics post-merger, worrying investors about stability and transparency.