Lokmat Money >बँकिंग > HDFC Bank च्या ग्राहकांना अलर्ट; 'या' दिवशी UPI सेवा वापरता येणार नाही, जाणून घ्या

HDFC Bank च्या ग्राहकांना अलर्ट; 'या' दिवशी UPI सेवा वापरता येणार नाही, जाणून घ्या

HDFC Bank UPI Service: देशात युनिफाइड पेमेंटइंटरफेसद्वारे (UPI) पैसे पाठवणे आणि मिळवणं अतिशय सोपं झालं आहे. किराणा दुकानदारांपासून भाजी विक्रेत्यांपर्यंत लोक यूपीआयच्या माध्यमातून पैसे देतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:09 IST2025-02-06T11:07:10+5:302025-02-06T11:09:11+5:30

HDFC Bank UPI Service: देशात युनिफाइड पेमेंटइंटरफेसद्वारे (UPI) पैसे पाठवणे आणि मिळवणं अतिशय सोपं झालं आहे. किराणा दुकानदारांपासून भाजी विक्रेत्यांपर्यंत लोक यूपीआयच्या माध्यमातून पैसे देतात.

Alert to HDFC Bank customers UPI service will not be available on 8th february know this | HDFC Bank च्या ग्राहकांना अलर्ट; 'या' दिवशी UPI सेवा वापरता येणार नाही, जाणून घ्या

HDFC Bank च्या ग्राहकांना अलर्ट; 'या' दिवशी UPI सेवा वापरता येणार नाही, जाणून घ्या

HDFC Bank UPI Service: देशात युनिफाइड पेमेंटइंटरफेसद्वारे (UPI) पैसे पाठवणे आणि मिळवणं अतिशय सोपं झालं आहे. किराणा दुकानदारांपासून भाजी विक्रेत्यांपर्यंत लोक यूपीआयच्या माध्यमातून पैसे देतात. आता जगातील अनेक देशांमध्ये यूपीआय पेमेंटचाही वापर केला जात आहे. तर देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेनं यूपीआय व्यवहारांची माहिती दिली आहे.

एचडीएफसी बँकेनं आपल्या लाखो ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. सिस्टीम मेंटेनन्समुळे यूपीआय सेवा ८ फेब्रुवारी २०२५ रोजी काही तास काम करणार नसल्याचं बँकेने म्हटले आहे. ८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत यूपीआय सेवा बंद राहणार असल्याचं बँकेनं स्पष्ट केलंय. या दरम्यान बँकेचे ग्राहक यूपीआयच्या माध्यमातून कोणालाही पैसे पाठवू शकणार नाहीत.

क्रे़डिट कार्डाद्वारेही यूपीआय पेमेंट होणार नाही

बँकेनं दिलेल्या माहितीनुसार या डाऊनटाईम कालावधीदरम्यान एचडीएफसी बँकेच्या करंट आणि सेव्हिंग अकाऊंटसोबतच रुपे क्रेडिट कार्डच्या (RuPay Credit Card) माध्यमातून फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिल ट्रान्झॅक्शन करू शकणार नाही.

काय आहे यूपीआय?

डिजिटल पेमेंटसाठी यूपीआयसारख्या सुविधा तुम्हाला घरबसल्या सहज पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देतात. यासाठी यूपीआय सपोर्ट करणारी अॅप जसं की पेटीएम, फोन पे, भीम, गुगल पे यांची गरज असते. या माध्यमातून तुम्ही सहजरित्या मोबाइल नंबर किंवा स्कॅनर, यूपीआय आयडीवर पैसे पाठवू शकता.

Web Title: Alert to HDFC Bank customers UPI service will not be available on 8th february know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.