पतंजलीच्या IPO बाबत बाबा रामदेवांचा मोठा खुलासा, जाणून घ्या काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 07:57 PM2021-07-21T19:57:22+5:302021-07-21T19:59:08+5:30

baba ramdev : यावर्षी पतंजली आयपीओ सुरू करण्याची बाबा रामदेव यांची कोणतीही योजना नाही, मात्र सध्याच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस याबाबत निर्णय घेतला जाईल.

baba ramdev says patanjali ipo decision by 2021 end check details | पतंजलीच्या IPO बाबत बाबा रामदेवांचा मोठा खुलासा, जाणून घ्या काय म्हणाले?

पतंजलीच्या IPO बाबत बाबा रामदेवांचा मोठा खुलासा, जाणून घ्या काय म्हणाले?

Next

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) सतत येत असल्याचे दिसून येत आहे. एकापाठोपाठ एक कंपन्या आयपीओ लाँच करत आहेत. यातच आता योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या आयुर्वेद कंपनी पतंजलीचे (Patanjali) सुद्धा नाव जोडले जाणार आहे. बाबा रामदेव लवकरच पतंजली आयपीओ (Patanjali IPO) घेऊन येणार आहेत. या संदर्भात बाबा रामदेव यांनी आधीच संकेत दिले होते, पण आता ईटीला दिलेल्या मुलाखतीनुसार पतंजली आयपीओबाबत या वर्षाच्या अखेरीस निर्णय होण्याची शक्यता आहे. (baba ramdev says patanjali ipo decision by 2021 end check details)

काय म्हणाले बाबा रामदेव?
यावर्षी पतंजली आयपीओ सुरू करण्याची बाबा रामदेव यांची कोणतीही योजना नाही, मात्र सध्याच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस याबाबत निर्णय घेतला जाईल. बाबा रामदेव यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, आम्ही लवकरच पतंजलीच्या आयपीओबाबत निर्णय घेऊ. यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. पतंजली आयपीओबाबत निर्णय या आर्थिक वर्षाच्या अखेरीस घेता येईल. तसेच, ते म्हणाले की, सध्या रुची सोयाच्या (Ruchi Soya) 4,300 कोटी रुपयांच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरच्या (एफपीओ) आधी विविध संस्थात्मक गुंतवणूकदारांना भेटण्यात व्यस्त आहे.


काय आहे बाबा रामदेव यांची योजना?
रुची सोया इश्यू्च्या (Ruchi Soya issue) सुरूवातीला गुंतवणूकदारांकडून मिळालेला प्रतिसाद दृढ आहे आणि ते असे सुनिश्चित करतील की, आगामी भेटीत किंमत सर्व विद्यमान व संभाव्य भागधारकांच्या हिताच्या दृष्टीने ठरले, असे बाबा रामदेव म्हणाले. याचबरोबर, रुची सोयामधील संभाव्य गुंतवणूकदार आनंदी होऊ शकतात कारण कंपनी आपले स्वतःला एक अग्रगण्य एफएमसीजी कंपनी (FMCG) मध्ये बदलण्याचे लक्ष्य ठेवत आहे. तसेच, कमोडिटी व्यवसायाचा आकारही वाढेल याची आम्ही खात्री देऊ. विशेषत: खाद्यतेल (Edible oil) व्यवसाय वाढवायचा आहे, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

किती आहे पतंजलीचा टर्नओव्हर?
आर्थिक वर्ष 2021 मध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजलीने 30,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यवसाय केला. यापैकी रुची सोयाने विक्रीत 16,318 कोटी रुपयांचे योगदान दिले. वित्तीय वर्ष 2020 मधील विक्री 25,000 कोटी रुपये होती, त्यापैकी रुची सोयाने 13,117 कोटी रुपये दिले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: baba ramdev says patanjali ipo decision by 2021 end check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app