Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग

३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग

Ather Energy IPO Listing: एथर एनर्जी आयपीओची शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली. शेअर बाजारात आत विक्रीचं वातावरण आहे. सुरुवातीच्या सकारात्मक लिस्टिंगनंतर मात्र शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:57 IST2025-05-06T12:53:05+5:302025-05-06T12:57:03+5:30

Ather Energy IPO Listing: एथर एनर्जी आयपीओची शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली. शेअर बाजारात आत विक्रीचं वातावरण आहे. सुरुवातीच्या सकारात्मक लिस्टिंगनंतर मात्र शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. 

Ather Energy IPO listed at Rs 328 Shares hit hard after listing queues to sell shares | ३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग

३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग

Ather Energy IPO Listing: एथर एनर्जी आयपीओची शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली. बीएसईवर हा शेअर १.५७ टक्के म्हणजेच ५.०५ रुपयांच्या प्रीमियमसह ३२६.०५ रुपयांवर लिस्ट झाला. तर एनएसईवर एथर एनर्जीचा शेअर २.१७ टक्क्यांच्या प्रीमियमसह ३२८ रुपयांवर लिस्ट झाला. शेअर बाजारात आत विक्रीचं वातावरण आहे. सुरुवातीच्या सकारात्मक लिस्टिंगनंतर मात्र शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. 

पॉझिटिव्ह लिस्टिंगनंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. कामकाजादरम्यान एथर एनर्जीचे शेअर्स इश्यू प्राइसपेक्षा जवळपास ४ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर एथर एनर्जीच्या शेअर्सचा दिवसभरातील नीचांकी स्तर ३०८.९५ रुपये (सकाळी १०.५१ वाजेपर्यंतचा आकडा) आहे.

LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?

एथर एनर्जीआयपीओसाठी प्राइस बँड ३२१ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. कंपनीनं एकूण ४६ शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ७६६ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ३० रुपयांची सूट दिली होती.

२८ एप्रिलला खुला झाला आयपीओ

एथर एनर्जीआयपीओची साईज २९८१.०६ कोटी रुपये होती. या आयपीओमध्ये फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल या दोन्हींचा समावेश होता. नव्या इश्यूच्या माध्यमातून कंपनीनं ८.१८ कोटी शेअर्स आणि ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून १.११ कोटी शेअर्स जारी केले आहेत. कंपनीचा आयपीओ २८ एप्रिल रोजी खुला झाला होता. गुंतवणूकदारांना ३० एप्रिलपर्यंत कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी होती.

अखेरच्या दिवशी हा आयपीओ एकूण १.५० पट सब्सक्राइब झाला होता. रिटेल कॅटेगरीत या तीन दिवसांत आयपीओ १.८९ पट सब्सक्राइब झाला. तर क्यूआयबी कॅटेगरीमध्ये १.७६ पट आणि एनआयआय कॅटेगरीत ०.६९ पट आयपीओ सब्सक्राइब करण्यात आला होता.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Ather Energy IPO listed at Rs 328 Shares hit hard after listing queues to sell shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.