Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक

ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक

Apple Ceo Tim Cook : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नकारानंतरही, अ‍ॅपल भारतात सतत गुंतवणूक करत आहे. आयफोन उत्पादक कंपन्या फॉक्सकॉन आणि होन हाय प्रेसिजनने देशात मोठी गुंतवणूक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:33 IST2025-05-20T11:33:03+5:302025-05-20T11:33:39+5:30

Apple Ceo Tim Cook : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नकारानंतरही, अ‍ॅपल भारतात सतत गुंतवणूक करत आहे. आयफोन उत्पादक कंपन्या फॉक्सकॉन आणि होन हाय प्रेसिजनने देशात मोठी गुंतवणूक केली आहे.

apple ceo tim cook despite donald trump refusal invested so much in india | ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक

ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक

Apple Ceo Tim Cook : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोनची निर्मिती न करण्याचा सल्ला दिला होता. पण ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी त्यांचे ऐकले नाही. त्यांची कंपनी अ‍ॅपल भारतात सातत्याने मोठी गुंतवणूक करत आहे. याचाच भाग म्हणून, आयफोन बनवणारी मोठी कंपनी फॉक्सकॉनने (Foxconn) गेल्या ५ दिवसांत तब्बल १.४८ अब्ज डॉलर्स, म्हणजेच जवळपास १२,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासोबतच, तैवानची दुसरी मोठी आयफोन उत्पादक कंपनी होन हाय प्रेसिजन इंडस्ट्रीनेही (Hon Hai Precision Industry) भारतात १.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. होन हाय आता चीनमधील उत्पादन कमी करून ते भारतात हलवण्याचा विचार करत आहे.

या दोन्ही कंपन्यांनी शेअर बाजारात याबाबत अर्ज दाखल करून माहिती दिली आहे. फॉक्सकॉनने सिंगापूरमधील आपल्या कंपनीमार्फत तामिळनाडूतील युनिट, युजन टेक्नॉलॉजी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ही गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक १४ मे ते १९ मे या काळात झाली आहे. अ‍ॅपलची भारतात आयफोनचे उत्पादन वाढवण्याची योजना आहे आणि याचसाठी ही गुंतवणूक करण्यात आली आहे. दुसरीकडे, होन हाय प्रेसिजनने तैवानमधील भारतीय युनिटमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल सांगितले आहे.

भारत बनणार आयफोनचे मोठे केंद्र
अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, अमेरिकेत जून तिमाहीत विकले जाणारे बहुतेक आयफोन हे भारतात निर्मिती केलेले असतील. चीन आता इतर बाजारपेठांसाठी जास्त फोन बनवणार आहे. भारतात सध्या फॉक्सकॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन इंडिया या कंपन्या आयफोन बनवण्याचे काम करत आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांनी टिम कुक यांना भारतात उत्पादन न करता अमेरिकेतच आयफोन बनवण्यास सांगितले होते, पण त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला.

वाचा - शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण

भारतात आयफोन निर्मिती सर्वात स्वस्त
भारतात तयार होणारे बहुतेक आयफोन हे दक्षिण भारतातील होन हायच्या कारखान्यात जोडले (असेम्बल) जातात. टाटा समूहाचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन युनिटही हेच काम करते. टाटाच्या युनिटने विस्ट्रॉन कॉर्पचा भारतातील व्यवसाय विकत घेतला आहे आणि ते पेगाट्रॉन कॉर्पचे कामकाजही भारतात चालवतात. भारतात आयफोन बनवणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढत आहे. अमेरिकेपेक्षा भारतात उत्पादन खर्च खूप कमी असल्याने अ‍ॅपल स्वतः भारतात जास्त उत्पादन करू इच्छिते, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भारत लवकरच आयफोन उत्पादनाचे एक मोठे केंद्र बनण्याची शक्यता आहे.

Web Title: apple ceo tim cook despite donald trump refusal invested so much in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.