Alert! Prices of TVs, fridges and household items will go up in the new year | अलर्ट! नव्या वर्षात टीव्ही, फ्रीज आणि घरगुती वस्तूंच्या किमती वाढणार

अलर्ट! नव्या वर्षात टीव्ही, फ्रीज आणि घरगुती वस्तूंच्या किमती वाढणार

ठळक मुद्देनव्या वर्षात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढणारटीव्ही, फ्रीज आणि वॉशिंगमशीन खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती जवळपास १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली
नव्या वर्षात तुम्ही जर एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि इतर घरगुती टीकाऊ वस्तूंची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. 

अॅल्यूमिनिअम, स्टील आणि तांब्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यासोबतच वाहतूक खर्चातही वाढ होण्याची शक्यता असल्यानं इलेक्ट्रॉनिक वस्तू महागण्याची दाट शक्यता आहे. या व्यतिरिक्त, उत्पादकांच्या म्हणण्यानुसार पुरवठ्यात घट झाल्याने टेलिव्हिजन पॅनलच्या किमती दुपटी वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. तर प्लास्टिकच्या किमतीतही वाढ झाली आहे. या सर्वांचा परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती शुल्कावर होणार आहे. 

एलजी, पॅनासोनिक आणि थॉमसन यासारख्या कंपन्यांच्या वस्तूंच्या किमतीत वाढ होईल. तर सोनी कंपनीने अद्याप वाढीव किमतीबाबत निर्णय घेतलेला नाही. "कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं येणाऱ्या काळात आमच्या काही उत्पादनांच्या किमतीत जवळपास ६ ते ७ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. तर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १० ते ११ टक्क्यांची वाढ होऊ शकते", असं पॅनासोनिक इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ मनिष शर्मा यांनी सांगितलं. 

एलजी कंपनीकडून देखील नव्या वर्षात सात ते आठ टक्क्यांनी दरवाढ केली जाणार आहे. "येत्या वर्षाच्या सुरुवातीला आमच्या टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि इतर सर्व उत्पादनांच्या किमतीत आठ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. कच्चा माल आणि तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. याशिवाय प्लास्टिकची गरजही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमतही वाढणार आहे", असं एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे उपाध्यक्ष विजय बाबू यांनी सांगितलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Alert! Prices of TVs, fridges and household items will go up in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.