Airtel ने लाँच केले तीन जबरदस्त प्लॅन्स; दररोज 3GB डेटा, मोफत कॉलिंग, Disney+ Hotstar फ्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 10:18 PM2021-09-16T22:18:40+5:302021-09-16T22:19:12+5:30

Airtel Launches three new prepaid plans : दूरसंचार कंपनी एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी तीन नवे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत.

Airtel launches three prepaid plans with free Disney plus Hotstar subscription | Airtel ने लाँच केले तीन जबरदस्त प्लॅन्स; दररोज 3GB डेटा, मोफत कॉलिंग, Disney+ Hotstar फ्री

Airtel ने लाँच केले तीन जबरदस्त प्लॅन्स; दररोज 3GB डेटा, मोफत कॉलिंग, Disney+ Hotstar फ्री

Next
ठळक मुद्देदूरसंचार कंपनी एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी तीन नवे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलनं (Airtel Prepaid Plans) आपल्या ग्राहकांसाठी तीन नवे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. कंपनीनं 499 रूपये, 699 रूपये आणि 2798 रूपयांचे प्लॅन्स लाँच केले आहेत. एअरटेलच्या या प्लॅन्समध्ये कंपनी Disney+ Hotstar Mobile चं मोफत सबस्क्रिप्शनही देत आहे. याशिवाय या प्लॅन्समध्ये कंपनी दररोज 3GB डेटा आणि अन्य बेनिफिट्सही देत आहे. पाहूया अधिक माहिती. 

499 रूपयांच्या एअरटेलच्या प्लॅनसोबत 28 दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 3GB डेटा देत आहे. तसंच योसोबत दररोज 100 एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देण्यात येत आहे. याशिवाय या प्लॅनसोबत कंपनी Disney+ Hotstar Mobile चं एका वर्षाचं सबस्क्रिप्शन आणि 30 दिवसांसाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं सबस्क्रिप्शनही देत आहे. 

699 रूपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये कंपनी 56 दिवसांची वैधता देत आहे. यासोबत कंपनी दररोज 2GB डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, याशिवाय दररोज 100 एसएमएसचा लाभही देत आहे. या प्लॅनसोबतही कंपनी Disney+ Hotstar Mobile चं वर्षभराचं सबस्क्रिप्शन देत आहे. याशिवाय या प्लॅनसोबत अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ मोबाईल सबस्क्रिप्शनही मोफत देण्यात येत आहे. 

2798 रूपयांचा प्लॅन
या प्लॅनसोबत कंपनी 365 दिवसांची वैधता देत आहे. यासोबत Disney+ Hotstar Mobile चं वर्षभराचं सबस्क्रिप्शनही देण्यात येत आहे. या प्लॅनसह कंपनी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं 30 दिवसांचं सबस्क्रिप्शनहीजेत आहे. याशिवाय दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसही देण्यात येत आहे. या प्लॅनमध्ये FASTag च्या खरेदीवर 100 रूपयांचा कॅशबॅकही देण्यात येत आहे. 

Web Title: Airtel launches three prepaid plans with free Disney plus Hotstar subscription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app