After a record rise, gold and silver prices fell sharply today, remaining at the end of the day | विक्रमी वाढीनंतर आज सोने-चांदीच्या दरात झाली मोठी घसरण, दिवसअखेर असा राहिला भाव

विक्रमी वाढीनंतर आज सोने-चांदीच्या दरात झाली मोठी घसरण, दिवसअखेर असा राहिला भाव

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने-चांदीच्या दरात मंगळवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाली. घरगुती सराफा बाजारामध्ये मंगळवारी सोन्याचे दर प्रती १० ग्रॅम १ हजार ३१७ रुपयांनी घसरले . तर चांदीच्या प्रतिकिलो दरात २ हजार ९४३ रुपयांनी घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आज सोन्याचा भाव ५४ हजार ७६३ रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर चांदीचा दर ७३ हजार ६०० रुपये राहिला.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे भारतीय सराफा बाजारातही सोन्याची किंमत घटली. सोमवारी बाजारात सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅमसाठी ५६ हजार ८० रुपये होता. आज या भावात १ हजार ३१७ रुपयांची घट होऊन तो ५४ हजार ७६३ रुपये एवढा झाला. तर सोमवारी चांदीचा दर प्रतिकिलो ७६ हजार ५४३ रुपये प्रतिकिलो एवढा होता. आज त्यात दोन हजार ९४३ रुपयांनी घसरण होऊन तो ७३ हजार ६०० रुपयांवर आळा.

सोने-चांदीच्या आजच्या दराबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस चे व्हीपी नवनीत दमाणी यांनी सांगितले की, सोन्याचे दर उच्च पातळीवर पोहोचल्यानंतर गुंतवणुकदारांनी केलेली नफेवसुली आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. येत्या काळात भारतात सोन्याचा दर ५३ हजार ते ५३ हजार ५०० रुपये प्रति ग्रॅमपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After a record rise, gold and silver prices fell sharply today, remaining at the end of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.