Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स

EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स

EPFO Updates : कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ईपीएफओने अनेक बदल केले आहेत, ज्यामुळे तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 11:29 IST2025-05-19T11:28:09+5:302025-05-19T11:29:29+5:30

EPFO Updates : कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ईपीएफओने अनेक बदल केले आहेत, ज्यामुळे तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो.

5 big PF changes in 2025 EPFO members take note | EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स

EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स

EPFO Updates : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२५ मध्ये आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे पीएफ (PF) आणि पेन्शन (Pension) संबंधित कामं आता पूर्वीपेक्षा खूप सोपी, डिजिटल आणि पारदर्शक होणार आहेत. हे बदल तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि त्याचा तुमच्या बचत आणि पेन्शनवर काय परिणाम होईल, हे जाणून घेऊया.

१. प्रोफाइल अपडेट करणे आता सुपर-इझी!
EPFO मध्ये तुमची माहिती (प्रोफाइल) अपडेट करणं आता अगदी सोपं झालं आहे. जर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आधार कार्डशी लिंक असेल, तर तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, नागरिकत्व, आई-वडिलांचं नाव, वैवाहिक स्थिती आणि नोकरी जॉईन करण्याची तारीख हे सगळं घरी बसून, कोणत्याही कागदपत्रांशिवाय ऑनलाइन बदलू शकता. ज्यांचा UAN १ ऑक्टोबर २०१७ पूर्वी तयार झाला आहे, त्यांना काहीवेळा कंपनीकडून मंजुरी घ्यावी लागू शकते. पण यामुळे कर्मचाऱ्यांचा बराच वेळ आणि त्रास वाचणार आहे.

२. पीएफ ट्रान्सफर आता रॉकेट स्पीडने!
नोकरी बदलल्यावर पीएफ (PF) एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणं पूर्वी खूप किचकट होतं, कंपनीच्या परवानगीशिवाय ते शक्य नव्हतं. पण १५ जानेवारी २०२५ पासून EPFO ने ही प्रक्रिया एकदम सोपी केली आहे. आता बहुतेक वेळा तुम्हाला तुमच्या जुन्या किंवा नव्या कंपनीची परवानगीची गरज भासणार नाही. जर तुमचा UAN आधारशी जोडलेला असेल आणि तुमची वैयक्तिक माहिती (नाव, जन्मतारीख, लिंग) दोन्हीकडे सारखी असेल, तर तुमचा पीएफ झटपट ट्रान्सफर होईल. यामुळे तुमच्या बचतीचं व्यवस्थापन करणं आणि ते टिकवून ठेवणं सोपं जाईल.

३. पेन्शन पेमेंट आता थेट तुमच्या खात्यात!
१ जानेवारी २०२५ पासून EPFO ने सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) सुरू केली आहे. याचा अर्थ आता तुमची पेन्शन थेट NPCI प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही बँकेच्या खात्यात जमा होईल. पूर्वी पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवावी लागत होती, ज्यामुळे खूप वेळ जायचा. आता ही झंझट संपली आहे. महत्त्वाचं म्हणजे, नवीन PPO ला तुमच्या UAN शी जोडणं अनिवार्य असेल, ज्यामुळे पेन्शनधारकांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate) सादर करणं सोपं जाईल.

४. जास्त पगारावर जास्त पेन्शन, नियम स्पष्ट!
ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जास्त पगारावर पेन्शन हवी आहे, त्यांच्यासाठी EPFO ने नियम स्पष्ट केले आहेत. आता सगळ्यांसाठी एकच नियम असेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि तो जास्त योगदान देत असेल, तर त्याला जास्त पेन्शन मिळू शकेल. जे कंपन्या स्वतःचा ट्रस्ट चालवतात, त्यांनाही EPFO च्या नियमांचं पालन करावं लागेल. या नियमांमुळे पेन्शनची रक्कम वाढण्यास मदत होईल.

५. माहिती दुरुस्त करणं झालं एकदम सोपं!
१६ जानेवारी २०२५ रोजी EPFO ने जॉइंट डिक्लेरेशन फॉर्म (Joint Declaration Form - JDF) भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. जर तुमच्या पीएफ खात्यात काही चुकीची किंवा अपूर्ण माहिती असेल, तर ती दुरुस्त करणं आता खूप सोपं होणार आहे. यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल.

वाचा - बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम

एकंदरीत, EPFO ने केलेले हे बदल कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खूपच फायद्याचे ठरणार आहेत. यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होईल आणि प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनेल.

Web Title: 5 big PF changes in 2025 EPFO members take note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.