In 2020 world added 3 billionaires every 2 days India added one every week ambani adani on top | कोरोना महासाथीनंतरही ४० भारतीयांची अब्जाधीशांच्या यादीत एन्ट्री; अंबानी ठरले सर्वाधिक श्रीमंत

कोरोना महासाथीनंतरही ४० भारतीयांची अब्जाधीशांच्या यादीत एन्ट्री; अंबानी ठरले सर्वाधिक श्रीमंत

ठळक मुद्देअदानींची संपत्ती दुप्पटपतंजलीच्या आचार्य बाळकृष्ण यांच्या संपत्तीत घट

कोरोनाच्या महासाथीमध्ये देशाच्या अर्थव्यस्थेला मोठा फटका बसला होता. देशातच काय तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही नुकसान सोसावं लागलं होतं. परंतु अशी परिस्थिती असली तरी दुसरीकडे देशातील अब्जाधीशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०२० या आर्थिक वर्षात ४० भारतीय अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले. हुरुन ग्लोबल रिच लिस्टच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता भारतात राहणाऱ्या अब्जाधीशांची संख्या १७७ इतकी झाली आहे. जवळपास ८३ अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसोहत मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही ते नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. या कालावधीत त्यांच्या संपत्तीत २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

"अमेरिका आणि चीन ज्या ठिकाणी वेल्थ क्रिएशन टेक ड्रायव्हन होतं, परंतु भारतात वेल्थ क्रिएशन हे पारंपारिक किंवा सायकलिक व्यवसायाच्या माध्यमातून पाहिलं गेलं. जेव्हा वेल्थ क्रिएशन आपल्या पूर्ण क्षमतेवर असेल तेव्हा भारताच्या तुलनेत अब्जाधीशांची संख्या अमेरिकेत अधिक असेल," अशी प्रतिक्रिया हुरुन इंजियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य रिसर्चर अनास रेहमान जुनैदा यांनी दिली. 

अदानींची संपत्ती दुप्पट

२०२० या वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत दुपटीनं वाढ होऊन की ३२ अब्ज डॉलर्स इतकी झाली. यानंतर अदानी यांनी ४८ व्या स्थानावरून थेट २० व्या स्थानावर झेप घेतली. तर ते दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. गौतम अदानी यांचे बंधू विनोद यांच्या संपत्तीतही १२८ टक्क्यांची वाढ होऊन ती ९.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. 

या अहवालात व्यक्ती किंला कुटुंबाच्या संपत्तीचं आकलन १५ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार करण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब  म्हणजे या दरम्यान कोरोना महासाथीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत ७ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली होती. तसंच महासाथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनही लावावं लागलं होतं. हा अहवाल अशावेळी समोर आला जेव्हा के शेप रिकव्हरीबाबतीत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

बायजूच्या संपत्ती १०० टक्के वाढ

अहवालानुसार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी एचसीएलचे शिव नाडर हे तिसरे भारतीय श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्याकडे एकूण २७ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर दुसरीकजे सॉफ्टवेअर कंपनी जायक्लरचे जय चौधरी यांच्या नेटवर्थमध्ये २७४ टक्क्यांची वाढ होऊन ती आता १३ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. तर बायजू रविंद्रन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीत १०० टक्क्यांची वाढ होऊन ते आता २.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

आचार्य बाळकृष्णंच्या संपत्तीत घट

अहवालानुसार पतंजली आयुर्वेदचे आचार्य बाळकृष्ण यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी ३२ टक्क्यांची घसरण होऊन ती ३.६ अब्ज डॉलर्सवर आली. अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले महिंद्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीतही १०० टक्क्यांची वाढ होऊन की २.४ अब्ज डॉलर्स इतकी झाली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In 2020 world added 3 billionaires every 2 days India added one every week ambani adani on top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.