गणेशोत्सवात डीजेचा आवाज होणार का म्युट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:56 PM2019-08-31T13:56:27+5:302019-08-31T13:56:31+5:30

डीजेवर बंदी आणली असली तरी सर्वत्रच डीजेचा कर्णकर्कश आवाज ऐकायला मिळतो.

Will the DJ's voice be muted in Ganeshotsav? | गणेशोत्सवात डीजेचा आवाज होणार का म्युट?

गणेशोत्सवात डीजेचा आवाज होणार का म्युट?

Next

- योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : न्यायालयाने ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी डीजे व डॉल्बीवर बंदी घातली आहे.यामुळे गणेशोत्सवानिमित्त आयोजित शांतता समितीच्या सभेत पोलिस प्रशासनाच्या वतीने डीजे व डॉल्बी न वाजविण्याचे आवाहन केले जात आहे. यामुळे गणेशभक्तांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
गणेशोत्सव व नवरात्रोत्सवादरम्यान काढल्या जाणाऱ्या मिरवणूकीत डीजे व डॉल्बीच्या तालावर युवक धमाल करतात. मात्र २०१७ पासून सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्या नंतर अनेक ठिकाणी डीजेचा आवाज ‘म्युट’ करण्यात पोलिस प्रशासनाला यश आले. मात्र डीजेवर बंदी आणली असली तरी सर्वत्रच डीजेचा कर्णकर्कश आवाज ऐकायला मिळतो. यावर्षी पोलिस अधिक्षकांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यावेळेस डीजे चा आवाज म्युट होणार काय ? याकडे लक्ष लागले आहे. खºयाअर्थाने पोलिस प्रशासनासमोर डिजे आवाज म्युट करणे मोठे आव्हान आहे. बाप्पाच्या विर्सजनाच्या मिरवणुकीत खरी धमाल निर्माण होते ती डीजेमुळेच. मात्र यंदा डीजेवरील बंदीमुळे गणेश स्थापनेपूर्वीच गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

लेझीमसह ढोलचा वापर करा
पोलिस अधिक्षकांसह उपविभागीय पोलिस अधिकारी तालुक्याच्या ठिकाणासह संवेदनशिल गावामध्ये शांतता समितीच्या बैठका घेत आहेत. या बैठकीमध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत आहेत. डीजे ऐवजी लेझीमसह ढोलचा वापर करण्याचा सल्लाही देत आहेत.


तर पोलिस करणार कारवाई
मिरवणूकीदरम्यान कोणत्याही सार्वजनिक मंडळाने डीजेचा वापर केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके कार्यान्वीत केली आहेत.


गणेश विसर्जन मिरवणूकीत ध्वनी प्रदुषणाला स्थान नाही. डीजे किंवा डॉल्बीसारखे वाद्य वाजवून कुणीही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- प्रदीप पाटील,
उपविभागीय पोलिस अधिकारी, खामगाव.

Web Title: Will the DJ's voice be muted in Ganeshotsav?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.