Join us

कोणत्या सौंदर्यवतीवर जग फिदा? भारतातील सौंदर्यवतींनी अख्ख्या जगाला भुरळ घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 12:20 IST

भारतातील सौंदर्यवतींनी अख्ख्या जगाला भुरळ घातली आहे. आरसपानी सौंदर्य असलेल्या सौंदर्यवतींनी जगभरातील अनेक प्रमुख सौंदर्य स्पर्धांमध्ये ठसा उमटविला आहे.

भारतातील सौंदर्यवतींनी अख्ख्या जगाला भुरळ घातली आहे. आरसपानी सौंदर्य असलेल्या सौंदर्यवतींनी जगभरातील अनेक प्रमुख सौंदर्य स्पर्धांमध्ये ठसा उमटविला आहे. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचे. सर्वाधिक ६ वेळा भारतीय तरुणींनी ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट मिळविला आहे. भारतासोबतच व्हेनेझुएला या देशालाही समान यश मिळाले आहे. मात्र, चर्चा भारतीय सौदर्यवतींचीच जगभरात झाली. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते ऐश्वर्या राय आणि प्रियांका चोप्रा यांचे. यंदाची ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा भारतात होणार आहे. त्यानिमित्ताने...

महाराष्ट्रानेच मिळवून दिला पहिला मुकुट

भारताला सर्वप्रथम ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट महाराष्ट्रानेच मिळवून दिला. रिटा पॉवेल या मुंबईकर. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्यांच्याकडे योग्य वस्त्रे नव्हती. एवढेच काय तर त्यांच्याकडे पासपोर्टही नव्हता. मात्र, उधारीवर वस्त्रे घेऊन त्या स्पर्धेत सहभागी झाल्या आणि रॅम्पवर अशा काही चालल्या की, थेट ‘मिस वर्ल्ड’चा मुकुटच मिळविला. विशेष म्हणजे, त्या एमबीबीएस डॉक्टरही झाल्या.

स्पेन, मेक्सिको, चेकिया, तुर्किये, आयर्लण्ड, ग्रीस, जर्मनी, इजिप्त, ब्राझील, फिनलॅण्ड, फ्रान्स इत्यादी देशांच्या केवळ एकाच सौंदर्यवतीला विश्वसुंदरीचा खिताब मिळाला.

२७ वर्षांनी स्पर्धेचे भारतात आयोजन.

१६ डिसेंबरला स्पर्धा हाेणार आहे.

१९५१ मध्ये स्पर्धेला सुरुवात.

रिटा फारिया पाॅवेल या‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय साैंदर्यवती ठरल्या.

२८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुसऱ्यांदा भारतीय साैंदर्यवतीने ही स्पर्धा जिंकली. ४ वेळा नव्वदच्या दशकात भारतीय तरुणी मिस वर्ल्ड ठरली.

टॅग्स :विश्वसुंदरी