Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्याची इन्स्टा पोस्ट; अभिषेकच्या वाढदिवसादिवशीच दिले संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 23:27 IST

ऐश्वर्या अभिषेकला सोडून मुलीसह दुसरीकडे रहायला गेल्याचेही वृत्त आले होते. सारे काही आलबेल नाही, घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नातं तुटेल सांगता येत नाही. अनेक जोड्या कित्येक वर्षांचा संसार मोडून घटस्फोटाचा निर्णय घेत आहेत. अशातच गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्ध अभिनेत्री एश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात सारे काही आलबेल नाही, घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर आज दिवसभरात अभिषेकचा वाढदिवस असूनही ऐश्वर्याने शुभेच्छा न दिल्याने तर आणखीनच चर्चांना उधाण आले होते. अखेर काही वेळापूर्वीच ऐश्वर्याने इन्स्टावर पोस्ट केली आहे. 

ऐश्वर्या अभिषेकला सोडून मुलीसह दुसरीकडे रहायला गेल्याचेही वृत्त आले होते. अखेर आज ऐश्वर्यानेच या सर्व चर्चांना फुलस्टॉप देण्याचा प्रयत्न केला आहे. ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे पोस्टमध्ये म्हणत ऐश्वर्याने अभिषेकला खूप आनंद, प्रेम, शांती, शांती आणि उत्तम आरोग्य देवो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये ऐश्वर्याने अभिषेकला टॅगवगैरे काही केलेले नाहीय, की त्याने नाव घेतले आहे. परंतु मुलीसोबतचा दोघांचाही फोटो पोस्ट केला आहे. आणखी एका फोटोत अभिषेकचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. तिघांच्या एकत्र फोटोतून ऐश्वर्याने अभिषेकसोबतच असल्याचे दाखविले आहे. 

टॅग्स :अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चनघटस्फोट